शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कथित अपहरणाच्या वार्तेची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 02:40 IST

चार लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या कथीत वार्तेची शहरात अद्यापही दहशत कायम आहे.

पालक भयभीत : विद्यार्थ्यांमध्ये दहशत, पोलिसांची संपूर्ण जिल्हाभर नाकेबंदीपांढरकवडा : चार लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या कथीत वार्तेची शहरात अद्यापही दहशत कायम आहे. दरम्यान कोणत्याही मुलाचे शहरातून अपहरण झाले नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणेदार गुलाब वाघ यांनी केले आहे़सोमवारी येथील गजानन महाराज मंदिर परिसरातून मारोती व्हॅनमध्ये चार लहान मुलांना जबरदस्तीने टाकून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या पृथ्वी आकाश वल्लभवार या १४ वर्षीय विद्यार्थ्याने शेजारच्या लोकांना सांगितले होती. त्यावरून प्रदीप राशतवार व शेजारच्या काहींनी क्षणाचाही विलंब न करता तडकाफडकी पोलीस ठाणे गाठले होते. दरम्यान ही वार्ता शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली़ त्यामुळे पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली़ विशेष म्हणजे ज्या पृथ्वी या विद्यार्थ्याने ही घटना पोलिसांना सांगितली, त्याने कोणत्या वाहनात मुलांना नेले, त्या वाहनाचा क्रमांकही पोलिसांना सांगितला़. एम़एच़३१-क्यू.५४७४ क्रमांकाच्या मारोती व्हॅनमध्ये जबरीने मुलांना बसवून नेल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने वेगाने तपासाला सुरूवात केली़ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, टोल नाक्यावर या क्रमांकाच्या वाहनाबाबत माहिती देण्यात आली़ सोमवारी सकाळी ९ वाजतापासून संपूर्ण शहरात कथीत अपहरणाचीच चर्चा सुरू होती. सोमवारी कृषी भवनमध्ये खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची मतमोजनणी होती़ यानिमित्ताने परिसरातील तसेच खेड्यापाड्यातील लोकांनी गर्दी केली होती़ मात्र त्याही ठिकाणी कथीत अपहरणाचीच चर्चा सुरू होती़ पोलिसांनी शहरातील सर्व शाळेत जाऊन याबाबत माहिती दिली़ मात्र तरीही दिवसभर शहरवासीयांवर भितीचे सावट पसरले होते़ अनेक पालकांनी आपली मुले शाळेत आहे, की नाही याची खात्री करून घेतली़ तथापि अद्यापही आपला मुलगा घरी आला नाही, अशा प्रकारची तक्रार कुणीही पोलिसांत केली नाही़ मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमुळे एवढी खळबळ उडाली, तो पृथ्वी पोलिसांना दिलेल्या माहितीवर ठाम आहे़ स्वत: माझ्या डोळ्याने मी हा प्रकार पाहिल्याचे तो सांगत आहे. या प्रकाराबाबत शहरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे़ दरम्यान, हा अफवा पसरविण्याचा तर प्रकार नाही ना, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहे. या अपवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)