शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकातील गुंडांची ‘कुंडली’ तयार

By admin | Updated: September 7, 2014 00:10 IST

पोलीस दफ्तरी गंभीर गुन्हे शिरावर नोंद असलेल्या दोन दशकातील गुंडांची कुंडली तयार केली जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आणि तडीपारीच्या प्रस्तावापाठोपाठ आता या गुंडांवर एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे.

सतीश येटरे - यवतमाळ पोलीस दफ्तरी गंभीर गुन्हे शिरावर नोंद असलेल्या दोन दशकातील गुंडांची कुंडली तयार केली जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आणि तडीपारीच्या प्रस्तावापाठोपाठ आता या गुंडांवर एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नव्हे तर भल्या भल्या दादांची पाचावर धार बसली असून अनेकांनी गाव सोडण्याची तयारी चालविली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरून दादागिरीच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुंडांची जिल्ह्यात संख्या मोठी आहे. तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दिवसेंदिवस शरीर दुखापतीच्या आणि संपत्तीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेत आणि आगामी विधानसभा व दुर्गाेत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी येथे रूजू होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून गुंड आणि उपद्रव मुल्य जास्त असलेल्यांवर ११० कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा चालविला. त्यानंतर त्यांच्यातीलच २५ निवडक आणि सराईत गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार केले. तडीपारीचे प्रस्ताव तयार केलेल्या २५ टॉप गुंडांमधून किमान दहा जणांवर मोक्का-एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने १९९० पासूनचे गुन्ह्यांचे रेकॉर्ड काढले आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्या गुंडावर दाखल गुन्हे, न्यायप्रविष्ट खटले, खटल्यात निर्दाेष अथवा झालेली शिक्षा, पसार कालावधीत आश्रयस्थाने, हितचिंतक, शत्रू, जामीन घेणाऱ्या व्यक्ती, कुटुंबाची इत्यंभूत माहिती, व्यसन, छायाचित्र अशी कुंडलीच (डोजर) तयार केल्या गेली आहे. स्थानिक स्तरावर एमपीडीएचे तयार झालेले प्रस्ताव त्रुटीत निघून वरिष्ठ स्तराहून नाकारल्या जावू नये, यासाठी एमपीडीएच्या प्रस्ताव तयार करण्यात तज्ञ असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे. तडीपारीचे प्रस्ताव व एमपीडीए करण्यासाठी माहिती गोळा केली जात असल्याची कुणकुण लागल्याने गुन्हेगारी वर्तुळातही खळबळ उडाली आहे.