शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला जुन्या नोटांच्या बदल्यात जास्त भाव

By admin | Updated: November 18, 2016 02:30 IST

चलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

मार्केट बंद : शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा सौदागजानन अक्कलवार कळंबचलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. येथील बाजार समितीचे मार्केंट मागील नऊ तारखेपासून बंद आहे. असे असले तरी खासगीमध्ये जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला जात आहे. अनेक व्यापाऱ्यांजवळ चलनातून बाद झालेल्या लाखो रुपयांच्या नोटा पडलेल्या आहेत. ही रक्कम हवालाची असल्याचे सांगितले जाते. हा पैसा कुठे खर्ची घालावा याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडे कुठलाच पैसा नसल्यामुळे त्यांना घर कसे चालवावे, ही समस्या त्यांच्यापुढे उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटलेला आहे. कापूस वेचाई करणेही गरजेचे आहे. त्यामुळे मजुरांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. इतर व्यवहारही ठप्प पडले आहे. अशा परिस्थिीतीत शेतमाल विकण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर दुसरीकडे शेतमाल विकून नवीन चलनातील नोटा देणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे जुन्या नोटा देऊनच व्यवहार केला जात आहे. विशेष म्हणजे जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला जास्त किंमत दिली जात आहे. त्यामुळे हा व्यवहार चुकीचा असला तरी आता शेतकऱ्यांपुढे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, ही वास्तविकता आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जरी फायदा होत असला तरी व्यापाऱ्यांच्याही जुन्या नोटा चलनात येत आहे. हा त्यांच्यासाठी फायदाच म्हणावा लागेल. येथील बाजार समितीचे अधिकृत मार्केंट मागील एक हप्त्यापासून बंद आहे. त्यामुळे आपला शेतमाल कुठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यातून कसा मार्ग काढावा, याचे उत्तर कोणाजवळच नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग भरडला जात आहे. शासनाने अडीच लाखांची मर्यादा आखून दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुन्या नोटांना पसंती देणे सुरु केले आहे. कळंब शहरातील अनेक बँकांमध्ये पर्याप्त निधीच उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना त्यांच्या खात्यात पैसे असुनही ते मिळत नाही. सर्वांधिक गोची येथील मध्यवर्ती बँकेत खाते असणाऱ्यांची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे यातून शासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांना चुकारे कसे मिळणार?बाजार समितीचे मार्केंट सुरु केल्यास शेतकऱ्यांना चुकारे कसे द्यावे, हा पेच निर्माण झाला आहे. बाजार समिती अ‍ॅक्टनुसार शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत रक्कम देणे बंधनकारक आहे. त्यामुळे धनादेशाने रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात २४ तासाच्या आत रक्कम येणे शक्यच नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.