शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

हतबल संतोषला मदतीचा हात

By admin | Updated: May 22, 2014 01:36 IST

येथील फूटवेअरचा व्यवसाय करणार्‍या संतोष जयस्वाल यांचे दुकान नुकतेच आगीत जळून भस्मसात झाले.

आर्णी : येथील फूटवेअरचा व्यवसाय करणार्‍या संतोष जयस्वाल यांचे दुकान नुकतेच आगीत जळून भस्मसात झाले. यामुळे त्याच्यासमोर उपजीविका कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात संतोषच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, असे आवाहन २0 मेच्या अंकातून लोकमतने केले होते. लोकमतने केलेल्या आवाहनाला आर्णीकरांनी प्रतिसाद देत संतोषला व्यवसाय उभारण्यासाठी २५ हजार रुपयांची मदत दिली.

संतोष जयस्वाल यांचे आर्णी येथे फूटवेअरचे दुकान होते. मुलांचे शिक्षण, कुटुंब व आईचे आजारपण करीत संतोष आपला व्यवसाय सांभाळत होता. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या संतोषचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे तो पुरता हादरला होता. अशातच लोकमतने त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी समाजातील संवेदनांना हाक दिली. या बातमीची दखल घेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते व लहान-मोठय़ा व्यावसायिकांनी पुढाकार घेत एकाच दिवशी २५ हजार रुपयांचा निधी गोळा केला. हा निधी संतोषच्या घरी जावून त्याला सुपूर्द केला. तेव्हा मात्र संतोष अगदी भारावून गेला होता. त्याच्या डोळ्यातील आसवांना आर्णीकरांच्या संवेदनशीलतेचे उपकार कसे मानावे, हेच सुचत नव्हते.

या प्रसंगी उपस्थितांनी संतोषला धीर दिला. माझे सर्वस्व आगीने गिळंकृत केल्यामुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येवू लागले होते. मात्र तुम्ही दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे मी पुन्हा नव्याने माझा व्यवसाय उभा करू शकेन, असे सांगत असताना संतोष पुन्हा रडू लागला. या निमित्ताने संकटात सापडलेल्या एका व्यावसायिकाला सामाजिक कार्यकर्त्यांच्या उत्तरदायित्वामुळे जगण्याचे नवे बळ मिळाले आहे. या मदतीसाठी आर्णीतील व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील अरविंद देशकरी, विठ्ठल देशमुख, राजेंद्र शिवरामवार, सुनील जयस्वाल, नीलेश गावंडे, प्रशांत निलावार, विजय जयस्वाल, यासिम इसानी, विश्‍वास सवने, उद्धव भालेराव, प्रींटींग प्रेस असोसिएशनचे सदस्य, बार असोसिएशनचे अध्यक्ष, सराफा लाईनचे सदस्य आदी मंडळींनी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)