शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्याकरीता कृषी पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : मागील आठ दिवसांमध्ये तालुक्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके खराब झालेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी नुकसान भरपाईसाठी कृषी विभाग व महसूल विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्याकरीता कृषी पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. याकरिता विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने संबंधित पीक विमा कंपनी व तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांमध्ये समन्वय साधून नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची महसूल विभागातर्फे प्रत्यक्षरित्या पाहणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील पीक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्याकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक