शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर दमदार पाऊस शेतकरी राजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व लागवडीला वेग : उन्हाच्या दाहकतेतून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी हजेरी लावली. यानंतर सतत दोन दिवस पाऊस कोसळला. आतापर्यंत १६ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणारा आहे.विदर्भात पावसाला १० ते २० जूनच्या सुमारास प्रारंभ होतो. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस ३१ मे रोजी पोहोचला. मान्सूनच्या पावसाला सध्या विलंब असला तरी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. निसर्ग वादळाचा परिणाम बुधवारी जिल्ह्यात जाणवला. वादळ-वाºयाने जिल्ह्यातील वीज पुरवठा अनेक भागात खंडित झाला. वीज वितरण कंपनीचे खांब वाकून ताराही तुटल्या. यात वीज कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले. काही भागात वृक्ष उन्मळून पडले. पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही स्पष्ट केले आहे.पेरणीपूर्व कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. काडी कचरा वेचणे, वखरण करणे ही कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे. पेरणीसाठी रान तयार करून बी-बियाण्यांची व्यवस्था करण्यासाठी सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. कर्जमुक्तीस पात्र ठरल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही बँकांनी कर्ज माफ झाले अशी सूचनाच प्रसिद्ध केली नाही. यामुळे नव्याने कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया थांबली आहे. यातून शेतकऱ्यांपुढे बी-बियाणे, खत आणि इतर कामांसाठी आर्थिक अडचण भासत आहे.सरासरी १५ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात १ ते ३ जूनपर्यंत १५.७ मिमी पावसाची नोंद झाली. गत २४ तासात जिल्ह्यात ९.५५ मिमी पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पावसाची नोंद केळापूर तालुक्यात करण्यात आली. या ठिकाणी ३२.७९ मिमी पाऊस कोसळला. यवतमाळात ७.५५ मिमी, बाभूळगाव १६.५ मिमी, कळंब १७.२१ मिमी, दारव्हा ८.८९ मिमी, दिग्रस २७ मिमी, आर्णी २०.५४ मिमी, नेर १५.४२ मिमी, पुसद १९.०३ मिमी, उमरखेड ११.६१ मिमी, महागाव २५.११ मिमी, वणी २.५९ मिमी, मारेगाव २.४० मिमी, झरी जामणी ३.७० मिमी, घाटंजी २१.५० मिमी, राळेगाव २८.४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात गत तीन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात नोंदविला गेला. तर सर्वात कमी पावसाची नोंद मारेगाव तालुक्यात आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती