शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

वादळाचा तडाखा यवतमाळ, दारव्हा, नेर, कळंब, बाभूळगाव, घाटंजी, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी आणि झरी तालुक्याला बसला. पुसद तालुक्यातील जांब शिवारात सर्वाधिक ३७ मिमी पावसाची नोंद झाली. वादळामुळे अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. पोलीस चौक्यांचे नुकसान झाले. विजेचे खांब वाकले. ताराही तुटून पडल्या. यवतमाळ शहरातील अर्ध्या अधिक भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.

ठळक मुद्दे५४ घरांची पडझड : दोन जखमी, वीज पडून बैल ठार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रविवारी सायंकाळी आलेल्या वादळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात ५४ घरांची पडझड झाली. वृक्ष कोसळून दोन जण जखमी झाले. तर वीज पडून एक बैल ठार झाला. आंबा, चिंच, कांदा, केळी आणि टरबुज पिकाचे नुकसान झाले. सरासरी ५.९० मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली.वादळाचा तडाखा यवतमाळ, दारव्हा, नेर, कळंब, बाभूळगाव, घाटंजी, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी आणि झरी तालुक्याला बसला. पुसद तालुक्यातील जांब शिवारात सर्वाधिक ३७ मिमी पावसाची नोंद झाली. वादळामुळे अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. पोलीस चौक्यांचे नुकसान झाले. विजेचे खांब वाकले. ताराही तुटून पडल्या. यवतमाळ शहरातील अर्ध्या अधिक भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.यवतमाळात ७ घरांची पडझड झाली. कळंबमध्ये ५ घरांचे नुकसान झाले. घाटंजीत १ घर कोसळले. बाभूळगावात २३ घरे आणि ६ गोठ्यांचे नुकसान झाले. केळापुरात एका घराचे नुकसान झाले. झरी तालुक्यात १० घरे पडली. शेंबाळपिंप्रीमध्ये एका घराचे नुकसान झाले. कळंबमध्ये चार हेक्टर केळीच्या बागेचे नुकसान झाले. बाभूळगावमध्ये पपईच्या शेतीचे नुकसान झाले. कांदा, आंबा, फळपीक आणि भाजीपाला पिकांना फटका बसला. बाभूळगाव तालुक्यातील कोपरा जानकरमध्ये वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली दोन व्यक्ती जखमी झाल्या. वणीत वीज कोसळून बैल ठार झाला.यावर्षी पावसाळा वेळेवरगतवर्षी २२ दिवस पाऊस उशिरा आला. मात्र यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने वेळेवर हजेरी लावली. यामुळे हवामान खात्याने पाऊस वेळेवर बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.वीज वितरण कंपनीचे सर्वेक्षण युद्धपातळीवरदरवर्षी वीज वितरण कंपनीला वादळामुळे नुकसानीचा सामना करावा लागतो. रविवारच्या वादळाने पुन्हा नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण वीज कंपनीने युद्धपातळीवर सुरू केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस