शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पशु चिकित्सालयात प्रचंड असुविधा

By admin | Updated: October 17, 2016 01:49 IST

जनावरांवर योग्य उपचार व्हावे, यासाठी महागाव तालुक्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या पशु उपचार केंद्रात सध्या प्रचंड असुविधा निर्माण झाल्या आहे.

औषधांचा ठणठणाट : महागाव तालुक्यातील गोपालक हैराणमहागाव : जनावरांवर योग्य उपचार व्हावे, यासाठी महागाव तालुक्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या पशु उपचार केंद्रात सध्या प्रचंड असुविधा निर्माण झाल्या आहे. औषधांचा कायम ठणठणाट असून डॉक्टरही मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे महागाव तालुक्यातील एक लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महागाव तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. येथील बहुतांश नागरिकांचा गोपालन हा मुख्य व्यवसाय आहे. गावागावात शेकडो जनावरे आहे. या जनावरांची योग्य देखभाल आणि उपचार व्हावे यासाठी महागाव, फुलसावंगी, गुंज, वनोली, काळीदौलत, खडका, मुडाणा, पोहंडूळ, पोखरी, टेंभी आणि वडद अशा ११ ठिकाणी पशु उपचार केंद्र आहे. एकाही उपकेंद्राचे अधिकारी किंवा महागावचे विस्तार अधिकारी मुख्यालयी राहत नाही. वेळेवर उपचार मिळत नसल्याने तालुक्यात अनेक जनावरे तडफडून मरत आहे. सध्या जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. योग्य उपचार होत नसल्याने अनेकांनी आपली जनावरे विक्रीस काढली आहे. गेल्या दोन वर्षात किमान २० हजार जनावरे तालुक्यातून कमी झाली आहे. याचा फटका दूध उत्पादनाला बसत आहे. एकीकडे केंद्र शासन आणि राज्य शासन दुधाळ जनावरांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. परंतु या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जनावरांवर उपचारासाठी रुग्णालय आहे परंतु त्या ठिकाणी औषधांचा कायम ठणठणाट असतो. महागाव या तालुका मुख्यालयीच पशु वैद्यकीय अधिकारी १५-१५ दिवस येत नाही. तर इतर केंद्रांची काय स्थिती असेल हे न सांगितलेलेच बरे. बहुतांश ठिकाणी कंपाऊंडरच उपचार करताना दिसून येतो. जुजबी उपचार करून शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. (शहर प्रतिनिधी)लसीकरणाचा अभाव महागाव तालुक्यात जनावरांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. परंतु लसीकरणाची बोंबाबोंब आहे. पशुधन विमा, पीपीआर रोग निर्मूलन अभियान, लाळ, खुर रोगप्रतिबंधक, कुकुटपालन आदींबाबत कधीच मेळावे घेतले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील पशु उपचार केंद्र शोभेच्या वस्तू झाल्या आहेत.दयनीय अवस्थेला जबाबदार कोणमहागाव तालुक्यातील पशु उपचार केंद्राच्या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक पशु वैद्यकीय उपचार केंद्रात कामकाज ढेपाळले आहे. जिल्हा पशुधन विकास अधिकाऱ्यांची निष्क्रीयताही याला कारणीभूत आहे. तालुक्यातील पशु उपचार केंद्र कधी कात टाकणार असा प्रश्न आहे.