लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असे नामकरण करून त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र, या बदलांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक उपचार पद्धत वगळण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे. योजनेत हात व पायातील नसांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी (पेरिफेरल व्हॅस्क्युलर) मेडिकेटेड बलून उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या तत्सम अत्याधुनिक उपचारांचा समावेश न केल्याने हृदयरोग तज्ज्ञांना धक्का बसला आहे.
हृदयातील ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टीकरिता जनआरोग्य योजनेतून उपचार सुविधा मिळते. यात स्टेंट टाकून ब्लॉकेज दूर केले जातात. आता यापेक्षाही अधिक प्रभावी उपचार सुविधा आली आहे. ज्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिनीची इमेजिंग, कल्शियमयुक्त ब्लॉकेजेस (आयव्हीयूसी व ओसीटी) यावर उपचार करता येतो. याकरिता विशिष्ट प्रकारचा बलून लागतो.
डीईबी (औषधीयुक्त बलून), मायक्रो कॅथेटर, हायप्रेशर बलून याचा आधुनिक उपचार पद्धतीत वापर केला जातो. यामुळे रुग्णांच्या हृदयात स्टेंट टाकल्यानंतरही ब्लॉकेजेस आले असेल तर मेडिकोटेड बलून तेथे प्रभावी पद्धतीने काम करतो. जन आरोग्य योजनेतून हृदविकाराच्या रुग्णासाठी ही नवीन उपचार पद्धती लागू केली नाही.
याउलट 'पेरिफेरल व्हॅस्क्युलर' ज्यामध्ये हात-पायातील रक्तवाहिनी ब्लॉकेजमुळे बंद होते, तेथे वापरण्यास परवानगी दिली. मुळात हृदयरोग हा जीवघेणा आहे. तर हात-पाय यातील ब्लॉकेजमुळे थेट जिवाचा धोका निर्माण होत नाही. ही साधी बाबही जनआरोग्य योजनेचे धोरण ठरविणाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.
तरुणांना हृदविकाराचा धोका
हृदयविकारामुळे अचानक मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. आता तर थेट ३५ वर्षे वयोगटातील वर्गही या आजाराच्या टप्प्यात आला आहे. तरुण वयात अटॅक येण्याचे कारण पूर्णपणे कळू शकले नाही. कदाचित आयव्हस तंत्रज्ञानाने माहीत मिळाली तर एक प्रकारचा संशोधनात्मक सांख्यिकी माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल, असे ह्यदयरोग तज्ज्ञांचे मत आहे. जनआरोग्य योजनेच्या तज्ज्ञांनी हृदयविकाराकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित होते. या उलट हाता-पायात ब्लॉकेज असलेल्या रक्तवाहिनीवर उपचारासाठीचे नवे तंत्रज्ञान मंजूर केल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर याच क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टारांनी 'लोकमत' ला सांगितले.
Web Summary : Doctors are unhappy as the new health scheme excludes advanced heart treatments while including peripheral vascular procedures. This impacts younger heart patients needing innovative solutions like medicated balloons. Experts emphasize heart disease's severity over limb blockages, urging scheme revisions.
Web Summary : नई स्वास्थ्य योजना में हृदय रोग के आधुनिक उपचार शामिल नहीं होने से डॉक्टर नाखुश हैं, जबकि परिधीय संवहनी प्रक्रियाएं शामिल हैं। इससे युवा हृदय रोगियों पर असर पड़ेगा जिन्हें मेडिकेटेड गुब्बारों जैसे नवीन समाधानों की आवश्यकता है। विशेषज्ञों ने योजना में संशोधन का आग्रह किया है।