शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचच्यावतीने ‘पांढरे डाग’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

By admin | Updated: August 24, 2014 00:14 IST

लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यवतमाळच्या (आयएमए) सहकार्याने ‘पांढरे डाग’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार,

यवतमाळ : लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यवतमाळच्या (आयएमए) सहकार्याने ‘पांढरे डाग’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार, २४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी पुणे येथील डॉ. माया तुळपुळे मार्गदर्शन करणार असून, ‘नितळ’ चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला आहे. शरीरावर येणाऱ्या पांढऱ्या डागांना इंग्रजीत ल्युकोडर्मा असे म्हणतात. पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. खरे तर शरीरावरील पांढरे डाग म्हणजे कोणताही आजार नाही. शरीरात रंगाच्या काही कोषीका असतात त्या त्वचेचा रंग सावळा किंवा गोरा करतात. या कोषीकांना शरीर स्वत:हूनच नष्ट करतो. जेव्हा कोषीकांची संख्या कमी होते तेव्हा शरीरावर पांढरे डाग दिसने सुरू होतात. त्वचेवर असणाऱ्या या डागांचा इतर भागावर मात्र कोणताही परिणाम होत नाही. परंतु हा आजार झाला की, पीडित व्यक्ती निराशाजनक होते. अशा व्यक्तींमध्ये आशेचा नवा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न पुणे स्थित श्वेता असोसिएशन करीत आहे. त्याअंतर्गतच यवतमाळात या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. माया तुळपुळे या जनरल सर्जरीमध्ये एम.एस. असून, विविध ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. याचवेळी डॉ. माया तुळपुळे प्रस्तुत आणि सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर कृत ‘नितळ’ हा चित्रपट दाखविला जाईल. या चित्रपटात विक्रम गोखले, विजय तेंडुलकर, रिमा, निना कुलकर्णी, अमृता सुभाष यांच्यासह प्रतीथयश कलावंतांनी भुमिका साकरली आहे. या चित्रपटातून पांढरे डागाबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे.समाजाची पांढऱ्या डाग असलेल्या व्यक्तीप्रती असलेली नकारात्मक भुमिका बदलून आणि पीडित व्यक्तीमध्ये आशेचा नवा किरण निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, डॉ. टी.सी. राठोड, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र भुयार, सचिव डॉ. आशीष लोहिया, डॉ. रमेश पाटील यांनी केले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)