शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी मतदारसंघात निधी पळविला

By admin | Updated: September 3, 2014 00:04 IST

पालकमंत्र्यांनी अन्य आमदारांच्या विकास निधीत कपात करून आपल्या मतदारसंघात सर्वाधिक निधी पळवून नेल्याचा प्रकार पुढे आला. या निधीच्या पळवापळवीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना भोपळा : सदस्यांचा आक्षेप, काँग्रेस-राकाँ आमने सामने यवतमाळ : पालकमंत्र्यांनी अन्य आमदारांच्या विकास निधीत कपात करून आपल्या मतदारसंघात सर्वाधिक निधी पळवून नेल्याचा प्रकार पुढे आला. या निधीच्या पळवापळवीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे आमदार आपल्या मतदारसंघात डीपीसीचा निधी अधिकाधिक मिळविण्यासाठी आग्रही आहे. जिल्ह्यात १२ कोटी २५ लाखांचे वितरण करताना या निधीचा एक चतुर्थांश हिस्सा खुद्द पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात वळविला. या असमान वाटपावर डीपीसी सदस्यांनी आक्षेप घेतला. या निधीतून जनसुविधेंतर्गत कामे सुचविण्यात आली. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी तातडीने कामे पूर्ण केली जावी, या उद्देशाने कामे मागविण्यात आली होती. या कामांचे वाटप करताना विधानसभानिहाय निधी वितरित करण्यात आला. यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरविण्याऐवजी मतदारसंघात भूमिपूजनाचा धडाका लावणे हाच उद्देश असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी सर्वाधिक निधी आर्णी या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात वळविण्यात आला आहे. ३ कोटी ८८ लाख रुपये या मतदारसंघासाठी घेतले आहे. त्या खालोखाल दिग्रस मतदारसंघात दोन कोटी ५१ लाख देण्यात आले. प्रत्येक आमदाराला साधारणत: एक ते दीड कोटी रुपये देण्यात आले. त्या तुलनेत येथील आमदारांना हा निधी कमीच मिळाला आहे. वणी विधानसभेत आमदार वामनराव कासावार यांच्या वाट्याला १ कोटी ६५ लाख, राळेगाव विधानसभेत विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांना १ कोटी ५५ लाख, उमरखेड विधानसभेत १ कोटी ६३ लाख, यवतमाळ विधानसभेत एक कोटी तीन लाख रुपये असे वितरण करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुसद विधानसभेसाठी एकही रुपयाची तरतूद या निधीतून केलेली नाही. पालकमंत्र्यांनी सर्वाधिक निधी आपल्याकडे खेचून नेला, काँग्रेसच्या मंत्र्यांना एक पैसाही डीपीसीतून दिला नाही. असे असताना जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार, विरोधी पक्ष ब्रसुद्धा काढण्यास तयार नसल्याने त्यांच्या छुप्या संमतीने तर हे निधी वाटप झाले नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. डीपीसी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने हे प्रकरण बाहेर आले.