शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:01 IST

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री : शासन योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा, तीन लाखांवर शेतकºयांना कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी केंद्र्र आणि राज्य सरकार कार्य करीत आहे. हे सरकार माझं आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी उपस्थित होते.शासनाच्या विविध योजनांची प्रगती पालकमंत्र्यांनी सांगितली. कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास तीन लाख १४ हजार शेतकºयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषिपंप विद्युत जोडणी, मागेल त्याला शेततळे आदी योजनांची प्रगती त्यांनी सांगितली. जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित अभ्यासिका होत आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या घरकुलासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅकसाठी निधी मंजूर झाला. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग भूसंपादनाचा शेतकºयांना थेट खरेदीने मोबदला दिला जात आहे. १८५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी, एसपींचा सत्कारजिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. पोलिस उपनिरीक्षक सुरज बोंडे, यवतमाळच्या प्रथम महिला ठाणेदार शीतल मालटे, शिष्यवृत्तीत जिल्ह्यातून प्रथम आलेला अरमान शेंडे, पोलीस पाटील अशोक भोयर यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले.