शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीच्या महिलांची लॉकडाऊनवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

बचत गटातील महिलांनी परसबागेतील भाजीपाला, मासेमारी व्यवसाय करून लॉकडाऊनला मात दिली. तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बेंडे यांनी घाटंजी व पारवा पोलीस ठाण्यात जाऊन मासे विक्रीबाबत माहिती दिली. सोशल डिस्टन्सचे पालन करून ‘पेसा’अंतर्गत ग्रामसंघाने घेतलेल्या चार तलावामधून तीन हजार किलो मासे विक्री करण्यात आली. यातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले.

ठळक मुद्देमत्स्य निर्मिती व विक्रीतून रोजगार : संचारबंदीच्या काळात राबविले विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने देश व राज्यात संचारबंदी लावण्यात आली. मात्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद प्रकल्पाने वेगळा उपक्रम राबवून महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन लॉकडाऊनवर मात केली.बचत गटातील महिलांनी परसबागेतील भाजीपाला, मासेमारी व्यवसाय करून लॉकडाऊनला मात दिली. तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बेंडे यांनी घाटंजी व पारवा पोलीस ठाण्यात जाऊन मासे विक्रीबाबत माहिती दिली. सोशल डिस्टन्सचे पालन करून ‘पेसा’अंतर्गत ग्रामसंघाने घेतलेल्या चार तलावामधून तीन हजार किलो मासे विक्री करण्यात आली. यातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. उमेदचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी महिलांना संचारबंदी काळात रोजगार उपलब्ध करून दिला.गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी ग्रामसेवकांना सूचना दिल्या. महिलांकडून मास्क शिवून घेतले. यातून सहा लाख ५० हजार रुपये मिळाले. १७३ महिलांना रोजगार मिळाला. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सेंद्रीय भाजीपाला लावून त्याची विक्री केली.रोजगार अन् माणुसकीमहिलांनी रोजगारासोबतच माणुसकीचे दर्शन घडविले. पोलीस, आरोग्य इतर कर्मचाऱ्यांना तसेच बाहेर गावातून कामासाठी आलेल्या मजुरांना दररोज मोफत नाश्ता पुरविला. महिलांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदीतही आत्मविश्वास कायम ठेवला. धीरज नखाते, प्रवीण बेंडे यांच्या मार्गदर्शनात रोजगार प्राप्त करून कोरोनावर मात केली.

टॅग्स :Socialसामाजिक