शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेत सर्वसाधारण सभेचा धडाका

By admin | Updated: September 7, 2014 00:12 IST

नगरपरिषदेत सत्ताबदल झाल्यापासून सर्वसाधारण सभेचा धडाका सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात तीन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या. आता सप्टेंबरच्या सुरुवातीलाच शनिवारी सर्वसाधारण सभा झाली.

यवतमाळ : नगरपरिषदेत सत्ताबदल झाल्यापासून सर्वसाधारण सभेचा धडाका सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात तीन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या. आता सप्टेंबरच्या सुरुवातीलाच शनिवारी सर्वसाधारण सभा झाली. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही धडपड केली जात आहे. नगरपरिषदेने अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पॅच रिपेअरिंग व खडीकरणाची कामे मंजुरी केली आहे. तब्बल २५ लाख रुपये या कामांवर खर्च केले जाणार आहे. सदर कामाची झोननिहाय विभागनी करून त्यावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. झोन क्र.१ मध्ये सहा लाख, २ आणि ३ मध्ये प्रत्येकी साडेसात लाख, झोन क्र.४ मध्ये तीन लाख, यवतमाळ-पांढरकवडा राज्य मार्गाच्या उत्तर व दक्षिणेकडील भागात खडीकरणासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. या शिवाय वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून हिंदू स्मशानभूमीत मुंडण विधी, मृत्यू नोंदणी कार्यालय, वस्ती संकलन केंद्र व स्मशानभूमी परिसर सौंदर्यीकरण यासाठी पाच वेळा ई-निविदा मागविण्यात आल्या. मात्र केवळ एकाच कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय दरापेक्षा ९.९९ टक्के अतिरिक्त दराची निविदा दाखल केली. यावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र चर्चेअंती ५३ लाख ५३ हजार रुपयांच्या निविदा प्रस्तावाला मंजूर करण्यात आले. अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजनेतून मुस्लिम कब्रस्तानातील अंदाजपत्रकीय दरापेक्षा नऊ टक्के अधिक दरात असलेल्या १४ लाख १२ हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. बाजोरियानगरातील खुल्या जागेसाठी संरक्षक भिंतीच्या बांधकाम निविदेला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष सुभाष राय, उपाध्यक्ष मनीष दुबे, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांच्यासह सर्व समिती सभापती, नगरसेवक आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)