शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृत्रीम पाणवठे आहेत. यापैकी केवळ पाच ते सहा पाणवठ्यात आठ ते १० दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यानंतर तीव्र उन्हामुळे हे पाणवठेदेखील आटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनदी-नाल्यांवर निर्भर । वनविभागाला नव्या पाणवठ्यांसाठी निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी : जंगलात भटकणाऱ्या वन्यप्राण्यांची तहान भागावी, यासाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यांमध्ये ठणठणाट असून त्यामुळे आता या वन्यजीवांना नदी किंवा नैसर्गीक नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. सध्यातरी मानव-वन्यजीवांच्या संघर्षाची या परिसरात घटना घडली नसली तरी भविष्यात अशी घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृत्रीम पाणवठे आहेत. यापैकी केवळ पाच ते सहा पाणवठ्यात आठ ते १० दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यानंतर तीव्र उन्हामुळे हे पाणवठेदेखील आटण्याची शक्यता आहे. नाही म्हणायला अधुनमधून हजेरी लावणाºया अवकाळी पावसामुळे या पाणवठ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी साचते. परंतु नंतर तेही आटून जाते. त्यामुळे वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्त्यांकडे धाव घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.वणी वनपरिक्षेत्रात वाघ, हरिण, रोही, सांबर, रानडुक्कर, मोर, निलगाय, यासह अनेक वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. त्यांची जंगलातच तहान भागावी म्हणून वनविभागाच्यावतीन पाणवठे तयार करण्यात आले. परंतु हे पाणवठे कोरडे पडल्याने या वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी नदीकडे धाव घ्यावी लागत आहे. वणी वनपरिक्षेत्रातून वर्धा, पैनगंगा, निर्गुडा, विदर्भा यासह नांदेपेराजवळून एक मोठा नालाही वाहतो. या जलस्त्रोतातूनच वन्यजीव सध्यातरी आपली तहान भागवित असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.मोर, रानडुकरांच्या शिकारी वाढल्यासध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. त्यामुळे जंगलातून जाणारे रस्तेही निर्मनुष्य आहे. परिणामी वन्यजीव मुक्तपणे भटकंती करताना दिसत आहे. यातच काही शौकीनांकडून मोर व रानडुकरांच्या मोठ्या प्रमाणावर शिकारी केल्या जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात