आर्णी शहरात मोफत पाणीपुरवठा

By Admin | Updated: May 14, 2016 02:35 IST2016-05-14T02:35:43+5:302016-05-14T02:35:43+5:30

सध्या आर्णी शहर व तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरात काही भागात नगरपरिषदेव्दारे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Free water supply to Arni city | आर्णी शहरात मोफत पाणीपुरवठा

आर्णी शहरात मोफत पाणीपुरवठा

पालिकेचे प्रयत्न तोकडे : राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा शहरवासीयांसाठी पुढाकार
आर्णी : सध्या आर्णी शहर व तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरात काही भागात नगरपरिषदेव्दारे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येला हा
पाणीपुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने
मोफत पाणीपुरवठा नागरिकाना उपलब्ध करून दिला
आहे.
आमदार राजू तोडसाम, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, निलंकुश चव्हाण व फैय्याज सैयद आदी मंडळी शहरात मोफत पाणी वाटप करीत आहेत. काही मंडळी टॅँकरने तर काही घरच्या विहिरीवरून तर ज्यांच्या बोअरला पाणी आहे, असे नागरिक आपल्या बोअरवरून मोफत पाणी नागरिकांना वाटत आहेत. बाळासाहेब मुनगिनवार यांनी तर सोशल मीडियावरून आवाहन केले आहे की, कुणीही वॉटसअपवरून जरी संपर्क साधाला तरी त्या भागात टॅँकरव्दारा मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल.
यासाठी त्यांनी टॅँकरवर तीन लोकांची एक समितीच नेमली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी संबंधितांचे मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहे. तसेच कुठे टॅँकर देत असल्यास त्यांना मोफत डिझेल व पाण्याची सोय करून देण्यात येत आहे. केवळ शासनाच्या भरवशावर न बसता सर्वांनी काही प्रमाणात का होईना योगदान दिल्यास संकटावर मात करता येते, हेच आर्णी शहरातील या उपक्रमातून दिसून येत आहे. अतिशय चांगल्या अशा या पाणीवाटप उपक्रमाच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Free water supply to Arni city