शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मरची... ४ मेरोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
4
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
5
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
6
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
7
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
8
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
9
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
10
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
11
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
12
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
13
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
14
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
15
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
16
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
17
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
18
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
19
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
20
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव मतदारसंघात चौरंगी लढत

By admin | Updated: October 11, 2014 02:20 IST

राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे.

राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यांचे लक्ष केवळ राळेगाववरच राहिले. बाभूळगाव आणि कळंब हे दोन तालुके आणि करंजी सर्कलवर त्यांची कृपादृष्टी राहिली नाही. या बाबी त्यांच्यासाठी घातक सांगितल्या जात असल्यातरी मतदारसंघातील लोकांशी सततचा संपर्क, दादा गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि विरोधकांना छुप्या पध्दतीने मदत करणाऱ्यांची मौन भूमिका या बाबी त्यांच्यासाठी जमेच्या मानल्या जातात. कळंब तालुक्यातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे.भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. अशोक उईके हे चौथ्यांदा प्रा.पुरके यांच्याशी लढत देत आहे. मात्र ते गावागावात पक्षाचे संघटन उभे करण्यात यशस्वी झाले नाही. कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे वाणवा आहे. संस्था ताब्यात मिळविण्यात त्यांना यश आले नाही. तथापि पक्षाची परंपरागत मते आणि मोदी लाट या बाबी त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद एखाद्या तगड्या उमेदवाराला पराभूत करण्याइतपत नक्कीच होती. त्याचा अनुभवही काही निवडणुकांमध्ये आला आहे. परंतु यावेळचे चित्र वेगळे आहे. एक गट काँग्रेसमध्ये गेला तर विशेषत: कळंब तालुक्यातील लोकांनी कुुठे शब्द टाकणे सुुुरू केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद धुर्वे यांना मोठी कसरत करावी लागत आहे. जमादार उत्तम मडावी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांचा या मतदारसंघात फारसा संपर्क राहिला नाही. निवडणूक प्रचार करताना त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. शिवसैनिकांची साथ हीच त्यांच्यासाठी तेवढी जमेची बाजू आहे. याशिवाय इतर उमेदवारही आपलीच बाजू भक्कम असल्याचे सांगत मतांचा जोगवा मागत आहे. राळेगाव, कळंब, बाभूळगाव या पूर्ण तीन तालुक्यातील आणि रुंझा महसूल सर्कलमधील ४२३ गावातील साडेतीन लाखावर नागरिक या मतदारसंघात आहे. चार महत्त्वपूर्ण पक्षांचा प्रभाव मतदारसंघात थोड्याफार फरकाने सारखाच आहे. परिवर्तन हवे, नको, विकास झाला, नाही झाला, पुरकेंची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द, बेंबळा प्रकल्प, शेतमालाला दामसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, पंतप्रधान मोदींची शैली आदी विविध मुद्यांवर ही निवडणूक वेगळीच रंगत घेऊ लागली आहे.