शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयपेक्षा खासगी व्यापाऱ्यांची चौपट खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो सीसीआय व पणनला विकण्याचा फंडा नेहमीप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांनी राबविला. शेतकरी प्रयत्न करूनही सीसीआय केंद्रावर आपला कापूस विकू शकले नाही. हजारो रुपयांची तूट येत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. या सर्व व्यवहारात जिल्ह्यासह इतर तालुक्यातील व लगतच्या जिल्ह्यातील व्यापारी व दलालांनी चांगलाच नफा कमावला.

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : हमी भावात कापूस विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून सीसीआय केंद्रावर जावे लागते. सीसीआयने कापूस खरेदीची गती मंद ठेवल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. त्यामुळेच राळेगावमध्ये सीसीआय व पणन महासंघापेक्षा खासगी व्यापाऱ्यांनी चौपट कापसाची खरेदी केली.शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो सीसीआय व पणनला विकण्याचा फंडा नेहमीप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांनी राबविला. शेतकरी प्रयत्न करूनही सीसीआय केंद्रावर आपला कापूस विकू शकले नाही. हजारो रुपयांची तूट येत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. या सर्व व्यवहारात जिल्ह्यासह इतर तालुक्यातील व लगतच्या जिल्ह्यातील व्यापारी व दलालांनी चांगलाच नफा कमावला. अल्पभूधारक व सर्वसाधारण शेतकरी अजूनही कापूस कसा विकावा, या विवंचनेत आहे. राळेगाव, वाढोणाबाजार, खैरी येथे एकाच जिनिंगमध्ये कापूस खरेदी केला जात आहे. तेथे जास्त स्टॉक ठेवण्यात येऊ नये असा आदेश सीसीआयच्या अकोला मुख्यालयातून आला आहे. जिनिंगमध्ये वाढत्या तापमानात दिवसा जिनिंग केल्या जात नाही. केवळ एका पाळीतच जिनिंग होते. यामुळे आग लागण्याच्या भीतीच्या दडपणामुळे कापूस खरेदीला मर्यादा आल्या आहे. काही जिनिंगमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना, पाणी याची कमतरता आहे. कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, जिल्हाबंदी या विविध कारणांनी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. कापसासह सोयाबीन, तूर, चना या धान्य विक्रीतही शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे म्हणविल्या गेलेल्या स्थानिक दोन प्रतिनिधींनी निवेदन देणे व फोटोसेशन करणे यापुढे जावून काहीच केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहे.जिल्हाबंदी असतानाही परजिल्ह्यातील वाहने केंद्रावरराळेगावमध्ये वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातूनही कापसाची वाहने आली. मिनीट्रकसारख्या वाहनाने आलेला कापूसही मोजण्यात आला. जिल्हाबंदी असतानाही एम.एच.३४, एम.एच.३२ सिरिजचे वाहन राळेगाव कापूस केंद्रावर पोहोचले कसे याचा शोध घेण्याची गरज आहे.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड