जसराना अपार्टमेंटमधील चार घरे रात्रीतून फोडली

By Admin | Updated: May 24, 2014 23:55 IST2014-05-24T23:55:39+5:302014-05-24T23:55:39+5:30

दारव्हा रोडस्थित जसराना अपार्टमेंटमधील चार घरे एकाच रात्री फोडून चोरट्यांनी दागिण्यांसह सहा लाखांचा ऐवज लंपास केला. रात्रगस्त छेदून चोरट्यांनी गेम वाजविल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची

Four houses in the Jasrana apartment were beaten by night | जसराना अपार्टमेंटमधील चार घरे रात्रीतून फोडली

जसराना अपार्टमेंटमधील चार घरे रात्रीतून फोडली

दारव्हा रोडवर चोरट्यांचा धुडगूस : सहा लाखांचे दागिने लंपास

ं : दारव्हा रोडस्थित जसराना अपार्टमेंटमधील चार घरे एकाच रात्री फोडून चोरट्यांनी दागिण्यांसह सहा लाखांचा ऐवज लंपास केला. रात्रगस्त छेदून चोरट्यांनी गेम वाजविल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

रवींद्र बापुराव निमट, शेखर गादगीर, डॉ.संतोष जीभकाटे, कंझारिया यांच्याकडे चोरीच्या या घटना घडल्या आहेत. निमट कुटुंब अमरावतीला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी चॅनल गेट व नंतर लाकडी दाराचे कुलूप तोडून प्रवेश मिळविला.

सळाखीने कपाट फोडून १00 ग्रॅम सोने, ३00 ग्रॅम चांदीचे भांडे आणि २0 हजार रोख असा ३ लाख २५ हजार ६00 रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्याच अपार्टमेंटमधील शेखर गादगीर हेसुध्दा कुटुंबासह अमरावतीला गेले होते. त्यांचेही घर फोडण्यात आले. मात्र ते ऐवज सोबत घेऊन गेल्याने वाचला. केवळ दीड हजार रूपये चोरट्यांच्या हाती लागले. चोरट्यांनी डॉ.संतोष जीभकाटे, वीज वितरण कंपनीतील कंझारिया यांचेही घर फोडले. परंतू तेथे चोरट्यांची निराशा झाली.

जसराना अपार्टमेंटमध्ये हात साफ केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वाघापूरस्थित जवाहरनगरात वळविला. तेथे चंद्रशेखर भुरचंडी यांच्या घराला निशाणा बनविण्यात आले. ते कुटुंबासमवेत पुणे येथे गेले होते. त्यांच्या घराच्या कपाटातील आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, प्रत्येकी एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे २२ छोटे बिस्किट आणि रोख ४0 हजार असा तीन लाख ४0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या पाचही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्या.

यातील रवींद्र निमट आणि कौस्तुभ भुरचंडी या दोघांनीच शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून भादंवि ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उर्वरित तिघांनी तक्रार देणे टाळले. एकाच परिसरात पाच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Four houses in the Jasrana apartment were beaten by night