शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांना ‘टॉनिक’ची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:53 IST

मर्जीतील कंपनीचेच ‘टॉनिक’ शेतकºयांना विकावे, यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे. या ‘टॉनिक’चा नागपुरातून पुरवठा होतो आहे.

ठळक मुद्देनागपुरातून पुरवठा : शेतकºयांची दिशाभूल, कृषी प्रशासनावर राजकीय दबाव

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मर्जीतील कंपनीचेच ‘टॉनिक’ शेतकºयांना विकावे, यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे. या ‘टॉनिक’चा नागपुरातून पुरवठा होतो आहे. राजकीय दबावापोटी अव्वाच्या सव्वा दराने हे ‘टॉनिक’ शेतकºयांच्या माथी मारले जात आहे.पिकांना पीजीआर अर्थात प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर देण्याची पद्धत रुढ झाली आहे. शेतकºयांच्या भाषेत याला ‘टॉनिक’ म्हणून गणले जाते. ‘टॉनिक’ पुरवठ्याच्या या काही उत्पादनांना कृषी विभागाची परवानगी लागते. मात्र बहुतांश उत्पादने विनापरवानाच विकली जातात. सर्वच कृषी केंद्र ‘टॉनिक’चा हा माल उपलब्ध ठेवतात. शेतकºयांकडून त्याची नियमित मागणीही होते. परंतु यावर्षी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना विशिष्ट कंपनीनेच ‘टॉनिक’ विकावे, यासाठी खुद्द जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडूनच सक्ती केली जात आहे.प्रत्येक कृषी केंद्राला ६० ते ६५ हजार रुपये किंमतीच्या ‘टॉनिक’चा माल बळजबरीने पाठविण्यात आला आहे. नागपुरातून त्याचा पुरवठा होतो आहे. पुरवठा करणारी ही कंपनी नागपुरातील एका नेत्याची असल्याचे सांगितले जाते.अन्य कंपन्या ८० रुपये किलो दराने हे ‘टॉनिक’ विकत असताना नागपुरातील ही कंपनी १२० रुपये दराने त्याचा पुरवठा करीत आहे. अन्य कंपन्यांचे ‘टॉनिक’ विकता, तर मग आमचेही विका असे म्हणून कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे.स्थानिक पातळीवर त्यासाठी जिल्हा परिषदेतून कृषी प्रशासनावर दबाव निर्माण केला जात आहे. अखेर सक्ती केली जात असल्याने कृषी केंद्रांनी ‘टॉनिक’चा हा माल नाईलाजाने स्वीकारला असून तो आता जादा दरात शेतकºयांच्या माथी मारला जात आहे. या सक्तीच्या चौकशीचे आव्हान आहे.आठ कोटींची उलाढालविशिष्ट कंपनीचे ‘टॉनिक’ ‘ग्रो’ करण्यासाठी जिल्हाभरातील सुमारे १३०० कृषी केंद्रांना जिल्हा परिषद कृषी विभागाकडून सक्ती केली जात आहे. प्रत्येक कृषी केंद्रात ६० ते ६५ हजारांचा माल सक्तीने दिला जात आहे. हा हिशेब आठ कोटी ४५ लाखांच्या घरात जातो आहे. याच्या ‘मार्जीन’चे गणित जिल्हा परिषदेत सोडविले जाणार आहे.