शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

पाच सिंचन प्रकल्प ‘एसीबी’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:11 IST

राज्यात सिंचन विभागातील अपहाराचे प्रकरण गाजत आहे. पात्रता नसताना कंत्राटदारांना कामे देण्यात आली. अनेकांना नियमबाह्यरित्या अग्रीम मंजूर झाला. काही कंत्राटदारांना अवैध स्वरूपाच्या सवलती देण्यात आल्या. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाले.

ठळक मुद्देचौकशी सुरू : बाभूळगाव, दारव्हा, नेर, झरी तालुका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात सिंचन विभागातील अपहाराचे प्रकरण गाजत आहे. पात्रता नसताना कंत्राटदारांना कामे देण्यात आली. अनेकांना नियमबाह्यरित्या अग्रीम मंजूर झाला. काही कंत्राटदारांना अवैध स्वरूपाच्या सवलती देण्यात आल्या. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाले. न्यायालयाच्या निर्देशावरून स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संपूर्ण व्यवहाराची चौकशी करत आहे. यात जिल्ह्यातील पाच प्रकल्पांचा समावेश आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या कॅनलच्या कामात आणि डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामात कंत्राटदाराला विशेष सवलती व अवैधरित्या कंत्राट दिल्याचा ठपका आहे. याच पद्धतीने दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा, नेर तालुक्यातील कोहळ, झरी तालुक्यातील पाचपहूर या सिंचन प्रकल्पाच्या कामाबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे.यवतमाळातीलच अतुल जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एसीबीला याबाबत कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे. या प्रकरणाचा तपास फेब्रुवारीपासून सुरू आहे. विभागस्तरावर एसीबीच्या कामकाजावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर तपासाला गती मिळाली. यवतमाळ एसीबीचे उपअधीक्षक राजेश मुळे, पीआय क्षीरसागर यांच्या नेतृत्वात ही चौकशी सुरू आहे.सिंचन कार्यालयातील विविध फाईलींची तपासणीएसीबी सिंचन विभागाकडून विविध स्वरूपाची माहिती व कागदपत्रे मागत आहे. निविदेचे अध्यावतीकरण, सुसज्जता अग्रीम, कंत्राटदाराच्या एजंसीने सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र, जॉर्इंट व्हेंचरमध्ये घेतलेले कंत्राट, अनेक कंत्राटदारांनी नियुक्त केलेले उपकंत्राटदार आणि याशिवाय अवैध सवलती दिल्या गेल्या काय, याचीही पडताळणी एसीबीकडून सुरू आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प