शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

पाच कोटींचे टेंडर पालिकेत अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:00 AM

महिनाभराचा कालावधी लोटूनही या फाईली अजूनही काढण्यात आल्या नाही. कामाचा कार्यादेश न मिळाल्याने कंत्राटदारांपुढेही अडचण निर्माण झाली आहे. या कामांमध्ये शहरातील रस्ते, समाज भवन, खुल्या मैदानांना चेन्लींग फेन्सीग, उद्यान विकास आदी कामे समाविष्ट आहे. नेमक्या फाईल अडविण्यामागे कोणते कारण आहे याबाबतही स्पष्ट खुलासा करण्यात आला नाही.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचा प्रताप : अकाऊंट कोड तरतुदीच्या आधारे अडवणूकीची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटदाराशी करार करताना अकाऊंट कोड तरतुदीनुसार दोन नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहे. याच तरतुदीचा आधार घेत बांधकाम विभागात वैशिष््यपूर्ण निधीतील पाच कोटींच्या कामांच्या फाईली अडकविल्या आहेत. त्याची चर्चा कंत्राटदारांमध्ये सुरू आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर फाईल अडकविण्यामागे उद्देश काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.वैशिष््यपूर्ण निधीतील पाच कोटींची रक्कम, नगरोत्थान, दलितेत्तर, दलित वस्ती, नवीन हद्दवाढ क्षेत्रातील कामे यासाठी निविदा प्रक्रिया बोलाविण्यात आल्या होत्या. त्याला आॅक्टोबरच्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये जवळपास ७० कामांच्या निविदा आहेत. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर कंत्राटदाराला स्टॅम्प पेपरवर कामाचा करार करावा लागतो. या करारावर साक्षीदार म्हणून दोन नगरसेवकांच्या स्वाक्षºया असतात. अकाऊंट कोडनुसार ही तरतूद करण्यात आली आहे. मात्र करारावर स्वाक्षरीसाठीच या फाईल बांधकाम विभागात अडकविण्यात आल्या आहे. महिनाभराचा कालावधी लोटूनही या फाईली अजूनही काढण्यात आल्या नाही. कामाचा कार्यादेश न मिळाल्याने कंत्राटदारांपुढेही अडचण निर्माण झाली आहे. या कामांमध्ये शहरातील रस्ते, समाज भवन, खुल्या मैदानांना चेन्लींग फेन्सीग, उद्यान विकास आदी कामे समाविष्ट आहे. नेमक्या फाईल अडविण्यामागे कोणते कारण आहे याबाबतही स्पष्ट खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे कंत्राटदारसुद्धा संभ्रमात आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कार्यारंभ आदेश मिळण्याच्या टप्प्यावर फाईली थांबविल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. नगरपालिकेचा कारभार नेहमीच वादादीत राहिला आहे. यात बांधकाम विभाग सतत चर्चेत असतो. पाच कोटींच्या कामांचे कार्यादेश कधी दिले जातात याकडे लक्ष लागले आहे.कुठल्याही फाईल रखडल्या नाही. निविदेनंतर करार करताना कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. काही कंत्राटदारांनी एफडी केले नाही. त्यांना बोलविले आहे. बºयाच फाईली पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश काढले आहे. मात्र ते अद्यापही कंत्राटदारांनी नेले नाही. या करारावर साक्षीदार म्हणून नगरसेवकाला स्वाक्षरीचा अधिकार आहे. कुणीही करार वाचल्याशिवाय स्वाक्षरी करणे शक्य नाही. लवकरात लवकर कामे सुरू व्हावी यासाठीच प्रयत्न आहे.- विजय खडसेसभापती (बांधकाम)नगरपरिषद, यवतमाळ.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका