शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्स बाद होण्याची भीती; 30 सप्टेंबरपर्यंतचा कोटा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

आरटीओच्या ऑनलाईन साईटवर ३० सप्टेंबरपर्यंतचीच अपाॅईंटमेंट देण्यात आली आहे. त्या पुढच्या तारखा मिळत नाहीत. त्यामुळे शिकाऊ परवाना रद्द होण्याची भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता हा परवाना वाचविण्यासाठी पुन्हा शुल्क भरून तो रिन्यूअल करावा लागणार आहे. यासाठीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तर परिवहन विभागाला यातून मोठी रक्कम प्राप्त होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिकाऊ परवान्याची मुदत संपलेली आहे. तो नियमित करण्यासाठी अपाॅईंटमेंट मिळत नाही. दुसरीकडे रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक पोलिसांकडून तपासणी केली जाते. मुदत संपलेला परवाना दाखवूनही ते ऐकत नाहीत. थेट दंडाच्या पावत्या दिल्या जातात. असा फटका अनेकांना बसत आहे. आरटीओच्या ऑनलाईन साईटवर ३० सप्टेंबरपर्यंतचीच अपाॅईंटमेंट देण्यात आली आहे. त्या पुढच्या तारखा मिळत नाहीत. त्यामुळे शिकाऊ परवाना रद्द होण्याची भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता हा परवाना वाचविण्यासाठी पुन्हा शुल्क भरून तो रिन्यूअल करावा लागणार आहे. यासाठीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तर परिवहन विभागाला यातून मोठी रक्कम प्राप्त होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. 

काय आहेत अडचणी ? 

वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे परवाना मिळावा याकरिता दररोज अर्ज केले जातात. कोरोना संसर्गाच्या निर्बंधामुळे जवळपास दीड वर्ष परवाना देण्याची प्रक्रिया बंद होती. शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी परवाना घेण्यासाठी धडपडत आहेत. या कारणांमुळे एकाच वेळी गर्दी वाढली आहे.

तारीख मिळालेले येत नाहीत, येणाऱ्यांना तारीख मिळत नाही  शिकाऊ परवाना नियमित करण्यासाठी मोटर वाहन निरीक्षकांपुढे वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक द्यावे लागते. त्यात उत्तीर्ण झालेल्याला नियमित परवाना मिळतो. ज्यांना तारीख मिळाली ते प्रात्यक्षिक देण्यासाठी येण्याचे टाळतात. मात्र, यामुळे वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे. 

रोजचा कोटा ५०  एका मोटर वाहन निरीक्षकाला नियमित परवाना देण्यासाठी दिवसाला ५० जणांचे प्रात्यक्षिक घेण्याचा कोटा निश्चित केला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत असून अपाॅईंटमेंट मिळणे बंद झाले आहे.

लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?

कोरोना काळात लायसन्स मिळणे बंद होते. आता बाहेर फिरताना लायसन्स मागितले जाते. त्यासाठी शिकाऊ लायसन्स काढले आहे. मात्र, ते नियमित करण्यासाठी ऑनलाईन अपाॅईंटमेंट मिळत नाही.- यश भोयर, यवतमाळ 

ऑनलाईन प्रक्रियेनंतरही वाहन चालविण्याचा परवाना काढणे खर्चिक झाले आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला वारंवार जिल्ह्याच्या मुख्यालयी चकरा मारणे परवडत नाही. आता अपाॅईंमेंटच मिळत नाही.   - सदानंद वाघमारे, मोझर

शिकाऊ लायसन्स होतेय रिन्यूअल

लर्निंग लायसन्सची मुदत संपली असली तरी पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. केवळ ऑनलाईन अर्ज करून तेच लायसन्स रिन्यूअल करता येते. नंतर नियमित लायसन्ससाठी पुढची अपाॅईंटमेंट घ्यावी.  - दीपक गोपाळे, सहायक परिवहन अधिकारी. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस