शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: May 27, 2016 02:17 IST

तालुक्यातील शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची फरफट होत असून आता पावसाळा जवळ येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे.

रस्त्यांची दुरावस्था : शिवसेनेचे महागाव तहसीलदारांना निवेदनमहागाव : तालुक्यातील शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची फरफट होत असून आता पावसाळा जवळ येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे. पांदण रस्ते ३१ मेपूर्वी मोकळे करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. मागणी आली की लगेच कामाला प्राधान्य देऊन रस्ते मोकळे करून देण्याचे आदेश आहे. मात्र महागाव तालुक्यात रस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची फरफट होत आहे. उटी येथील पांदण रस्त्याचे काम क्षुल्लक कारणाने बंद करण्यात आले आहे. येथील आत्माराम गावंडे यांनी पांदण रस्ता जूनपूर्वी करुन देण्याची मागणी केली आहे. उटी पाठोपाठ तालुक्यातील शेकडो पांदण रस्त्यांची मागणी धूळ खात पडून आहे. पांदण रस्त्यांबाबत शासन आग्रही असताना स्थानिक प्रशासन कामच करायला तयार नाही. अनेक पांदण रस्ते मोजणीचे प्रस्ताव तालुका भूमी अभिलेख कार्यालयात तसेच पडून आहे. अंबोडा येथील डॉ. दादाराव देशमुख यांनी राज्य मार्गाला लागून असलेल्या शेतामधून स्मशानभूमीला जाण्यासाठी १५ ते २० फुटाचा रस्ता देऊ केला आहे. याच रस्त्याला लागून जुना पांदण रस्ता आहे. दोनही जागेचे सर्वेक्षण करुन स्मशानभूमीला तत्काळ रस्ता देण्यात यावा, याबाबत डॉ. देशमुख आग्रही आहेत. याच प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: दखल घेऊन रस्त्याचे तत्काळ मोजमाप करण्याचे आदेश दिले. परंतु भूमिअभिलेखला अद्याप वेळ मिळाला नाही.आता जून महिना तोंडावर आलेला असताना पांदण रस्त्याचे काम रखडले आहे. पांदण रस्ते मोकळे करुन देण्यासाठी अनेक शेतकरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. परंतु अद्यापही सकारात्मक निर्णय होत नाही. दरम्यान शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन देऊन आमणी बु., मुडाणा, उटी, महागाव, दहीसावळी, इजनी, पोहंडूळ, हिवरा व इतर गावातील रस्ते मोकळे करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण कदम, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. कैलास वानखडे, लक्ष्मीबाई पारवेकर, सतीश नरवाडे, अशोक तुमवार, संदीप खराटे, राजू देवतळे, ग्यानबा नावाडे, विशाल गुप्ता आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)