शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची महागाव कृषी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

ठळक मुद्देविम्यापासून वंचित : कपाशीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही, वर्ष लोटूनही बँक खात्यात रक्कम आलीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील अनेक शेतकरी कोरोना संकटाशी लढा देत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही २०१९ मधील खरीप हंगामातील कपाशीची नुकसान भरपाईमिळाली नाही. शेकडो शेतकरी विम्यापासून वंचित आहे. त्यांनी गुरुवारी कृषी कार्यालयावर धडक दिली.२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.गेल्या वर्षी खरिपात २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. ३७ हजार शेतकºयांनी लागवड केली होती. शेतकऱ्यांनी सोयाबीनचा प्रतिहेक्टर ३६० तर कपाशीचा प्रतिहेक्टर १५०० रुपयांप्रमाणे विमा हप्ता भरला. शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा हप्ता जमा केला. मात्र अनेक शेतकऱ्यांना कपाशीचा विमा मिळालाच नाही. यामुळे उटी येथील प्रकाश वानखेडे, मुकुंद गावंडे, गजानन वानखेडे, बापुराव वानखेडे, नत्थू मोरे, शांता धनगर, दत्ता वानखेडे, अशोक गावंडे, विजय वानखेडे आदींनी गुरूवारी कृषी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी विमा लाभ देण्याची मागणी लावून धरली.जिल्हा बँकेचा कोड बदलल्याने झाला विलंबजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोड बदलल्याने विमा मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी सुरेश भरवाडे यांनी सांगितले. कंपनीकडून त्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. महागाव शाखेची ८११ शेतकऱ्यांची यादी सादर केली आहे. लवकरच त्यांच्या खात्यात विमा अनुदानाचे पैसे जमा होईल, असे भरवाडे यांनी सांगितले. विमा प्रतिनिधी गुणवंत राठोड यांनी आपला विमा कंपनीसोबतचा करार जुलैमध्ये संपुष्टात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी विम्यासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारपूस करावे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती