शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कापसाचा पैसा कोंबडबाजारात

By admin | Updated: December 1, 2014 23:00 IST

पोलीस प्रशासनाच्या मेहरबानीने जिल्हाभर अवैध व्यवसायांची खुलेआम दुकाने सुरू झाली आहेत. या दुकानांमधील कोंबडबाजारात शेतकऱ्यांचा कापसाचा पैसाही बुडतो आहे.

यवतमाळ : पोलीस प्रशासनाच्या मेहरबानीने जिल्हाभर अवैध व्यवसायांची खुलेआम दुकाने सुरू झाली आहेत. या दुकानांमधील कोंबडबाजारात शेतकऱ्यांचा कापसाचा पैसाही बुडतो आहे.
जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आधीच नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहेत. शेतकऱ्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन हातचे गेलेल्या शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता. मात्र कापसाचे सरासरी उत्पन्न घटले आहे. त्यातही आहे तो कापसाचा पैसाही शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाताना दिसत नाही. त्यासाठी अवैध धंद्यांचे खुले काऊंटर कारणीभूत ठरले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात दारू, जुगार, मटका, सट्टापट्टी, कोंबडबाजार या सारखे अवैध धंदे चोरट्या मार्गाने सुरू होते. या धंदेवाईकांना हप्ते देऊनही पोलिसांची भीती होती. कारण हप्त्याचे केवळ लोकल कनेक्शन होते. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातून कोणत्याही क्षणी धाड पडण्याच्या भीतीने हे धंदे आतल्या आत चालविले जात होते. परंतु विधानसभेची निवडणूक पार पडताच हे सर्व धंदे रस्त्यावर आले आहे. त्यांची संख्या आणि त्यातील आर्थिक उलाढाल चौपटीने वाढली आहे. या धंद्यांना पोलीस प्रशासनाचेच अभय असल्याचे सांगितले जाते. या सर्व आर्थिक उलाढालीचे केंद्र बिंदू वणीतील वाहतूक शाखेत एकवटले असल्याची माहिती आहे. तेथूनच या उलाढालीतील लाभाचे पाट यवतमाळपर्यंत वाहत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या व्यवसायात सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात लुटला जात आहे. सध्या शेतकऱ्यांचा हंगाम आहे. कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. विक्रीसाठी कापूस बाजार समितीत, व्यापाऱ्याकडे आणल्यानंतर हाती आलेला पैसा शेतकरी घरी घेऊन जाण्याआधी वाटेतच दारू, जुगार, कोंबडबाजाराचे काऊंटर त्याला अडथळा निर्माण करीत आहे. शेतकऱ्यांचा कापसाचा बहुतांश पैसा हा कोंबडबाजारात जाताना दिसत आहे. जिल्ह्यात सर्वच भागात कोंबडबाजार चालविले जात असले तरी त्याची सर्वाधिक संख्या आणि उलाढाल ही वणी व पांढरकवडा विभागात असल्याची माहिती आहे. शिबला, झरी, करंजी, बोटोणी, देवधरी घाट, आंबेझरी, मोवाडा, शिरपूर, पुनवट, निलजई, दारव्हा, लाडखेड, मुकुटबन, रुईवाई जंगल, पारवा जंगल, अर्ली जंगल या भागात मोठ्या प्रमाणात कोंबडबाजार सुरू आहे. लहानात लहान कोंबडबाजाराची उलाढाल ही तीन ते चार लाख रुपयांच्या घरात आहे. तेथून पोलिसांना मिळणारा हप्ताही ७० ते ८० हजाराच्या आसपास असल्याचे बोलले जाते. झरी, वणी, पांढरकवडा, मारेगाव, घाटंजी, राळेगाव या पाच-सहा तालुक्यांमध्येच ५० ते ६० कोंबडबाजार असल्याचे सांगितले जाते. या कोंबडबाजार असलेल्या ठिकाणी दारू, नाश्ता व इतरही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कोंबडबाजार सहसा जंगलात चालविला जातो. तेथे पोलीस सहजासहजी पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली जाते. मात्र हप्त्याच्या माध्यमातून मिलीभगत असल्याने पोलिसांचा या कोंबडबाजारावर धाड घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोंबडबाजारात मोठी गुंतवणूक केली जाते. तेथे एका वेळी ५० हजार ते एक लाखापर्यंत बोली लावली जाते.
जिल्ह्यातील हे कोंबडबाजार व मटका-जुगार अड्डे सध्या कापसाचा पैसा खिशात घेऊन घराकडे निघालेल्या शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. त्यासाठी विशिष्ट एजंट शेतकऱ्यांना या धंद्यांकडे नेण्यासाठी नेमले गेले आहे. त्या धंद्यावर शेतकरी गेल्यानंतर त्याची खिशातील पैसा संपेपर्यंत सरबराई केली जाते. याच माध्यमातून कापूस उत्पादक शेतकरी लुटला जात आहे. आधीच दुष्काळात असलेल्या शेतकऱ्याचा कापसाचा पैसा घरी जाऊ नये, अशी खबरदारीच जणू या अवैध धंदेवाल्यांनी घेतल्याचे दिसून येते. त्यासाठी या शेतकऱ्यांना विशिष्ट पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढले जात आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे दरही चौपट झाले आहे. गेल्या कित्येक दिवसात पोलिसांनी कोंबडबाजारावर धाड मारल्याची नोंद नाही. यावरून पोलीस व कोंबडबाजाराची मिलीभगत सिद्ध होते. (जिल्हा प्रतिनिधी)