शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने उमरखेड तालुक्यात अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीची वेळही लांबली होती. आता सोयाबीन हाताशी आलेले असताना परतीचा पाऊस अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनला कोंबे फुटली आहे. कपाशीची बोंडे सडली आहे. हरभराही करपून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआमदार पोहोचले बांधावर : मुख्यमंत्र्यांपुढे प्रश्न मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जून, जुलैपेक्षाही गेल्या चार दिवसात तालुक्यात परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हाताशी आलेले सोयाबीनचे पीक निसर्गाने हिरावून घेतले. शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरश: संकटात सापडली. अखेर नवनिर्वाचित आमदार नामदेव ससाने यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात नुकसानीची पाहणी केली. भरपाईचा प्रश्न तातडीने मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीची वेळही लांबली होती. आता सोयाबीन हाताशी आलेले असताना परतीचा पाऊस अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनला कोंबे फुटली आहे. कपाशीची बोंडे सडली आहे. हरभराही करपून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.विडूळ, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड आणि देवसरी आदी गावातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार नामदेव ससाने यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, महेश काळेश्वरकर चालगणी सरपंच विजय सातलवाड, देवसरी सरपंच गजानन देवसरकर, पोलीस पाटील प्रमोद कदम, संचालक त्र्यंबक थोटे, साखरा सरपंच परसराम वानखेडे, प्रदीप देवसरकर, सुदर्शन रावते, अशोक थोटे, तलाठी जी.जी. क्षीरसागर, सुदर्शन माने, कृषी सहायक जी.एन. बिरमवार, संजय देशमुख, गुलाब सूर्यवंशी उपस्थित होते. चालगणी शिवारातील प्रयागबाई शिंदे यांच्या शेताची पाहणी केली.विडूळ येथील अत्यल्पभूधारक विधवा शेतकरी अर्चना यादव पहूरकर यांच्या घरी आमदारांनी भेट दिली. पावसामुळे त्यांचे सोयाबीन पूर्णत: पाण्याखाली आल्याने हे कुटुंब हतबल झाले आहे. या बहिणीला आमदार ससाने यांनी साडीचोळी देऊन शासनाकडून लवकरच अनुदान मिळवून देण्याचा शब्द दिला.या भेटीत महसूल, कृषी व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी मात्र गैरहजर होते. सलग सुट्यांमुळे नुकसानीचे सर्वेक्षण लांबत असल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला. कर्मचारी सुटीवर असले तरी नुकसानीचा पाहणी अहवाल तातडीने केल्या जाईल. त्यासाठी संबंधित कर्मचाºयांना सूचना दिल्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस