शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, उमरखेड ११२.१, महागाव ८०.२, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग दुसऱ्या दिवशी यवतमाळ शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले. यवतमाळसह कळंब, उमरखेड आणि महागाव या चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून उमरखेडमध्ये विक्रमी ११२.०१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. तर त्या पाठोपाठ महागावमध्ये ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, उमरखेड ११२.१, महागाव ८०.२, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून-जुलै या महिन्यात जिल्ह्यात साधारण ४२०.६ मिमी पाऊस होतो. बुधवारपर्यंत ५५५.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९२६ मिमी इतकी आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६७०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस ७८.२ टक्के इतका आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यात ६२ टक्के पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकरीच संकटात सापडले आहे. कपाशी, सोयाबीन आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे पिके सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची अपेक्षा आहे. 

घानमुख येथे अतिवृष्टीमुळे मातीबांध वाहून गेला- बिजोरा : महागाव तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे घानमुख सिंचन तलाव ओसंडून वाहू लागला. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सांडव्यालगतचा मातीबांध पूर्णतः वाहून गेला आहे. पाण्यामुळे त्या खालील शेती खरडली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. - सन २००३ मध्ये हा तलाव पूर्णत्वास आला, असे देविदास मोहकर यांनी सांगितले. कालव्याच्या सांडव्याच्या दुरुस्तीसाठी सांडव्याला जॅकेटिंग करणे, गाईडवॉल प्रोव्हाईड करणे, टेल चॅनलचे खोदकाम करणे, आदी कामांचे प्रस्ताव एक वर्षापूर्वीच  मंजुरीसाठी पाठविल्याचे उमरखेडचे जलसंधारण अधिकारी विवेक पिंपोले यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Rainपाऊस