शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट मिळाले नाही तरी आता करता येणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

रेल्वेमधून प्रवास करताना अनेकांना रिझर्वेशन उपलब्ध होत नाही तर काही प्रवासी रेल्वेमध्ये वेळेवर चढतात. अशावेळी प्रवाशांना तिकीट चेकरकडून मोठा दंड भरावा लागत होता. आता या प्रकारावर मात करण्यासाठी हॅन्ड हेल्ड टर्मिनल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही गाड्यांमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया टीसीमार्फत राबविली जात आहे. त्यामध्ये प्रवाशाकडून तिकीट काढल्यानंतर समोरच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेल्वेचे तिकीट काढताना वेटिंग लिस्ट मोठी आहे. या कारणाने अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. मात्र, अनेक वेळा विविध कारणांनी तिकीट रद्द होतात. अशावेळी रेल्वेने प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांना वेळेवरही तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. अशा स्वरूपाचे तिकीट काढल्यानंतर तिकीटाच्या एकूण दराच्या दहा टक्के रक्कम कमी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. याशिवाय हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या माध्यमातून रेल्वेत चढल्यानंतर तिकीट नसेल तर तिकीट चेकरच्या माध्यमातून हे तिकीट काढून पुढचा प्रवास करता येणार आहे. ही सुविधा सध्या काही मोजक्या गाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. इतर गाड्यांसाठी ही सुविधा सुरू झाली नाही. एकूणच काही शिथीलता रेल्वेने आणलेली आहे. 

नियमांची अंमलबजावणी लवकरच होईल 

रेल्वेमधून प्रवास करताना अनेकांना रिझर्वेशन उपलब्ध होत नाही तर काही प्रवासी रेल्वेमध्ये वेळेवर चढतात. अशावेळी प्रवाशांना तिकीट चेकरकडून मोठा दंड भरावा लागत होता. आता या प्रकारावर मात करण्यासाठी हॅन्ड हेल्ड टर्मिनल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही गाड्यांमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया टीसीमार्फत राबविली जात आहे. त्यामध्ये प्रवाशाकडून तिकीट काढल्यानंतर समोरच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय रेल्वेचे नुकसानही टळणार आहे. 

रेल्वे प्रशासनाने ग्राहकांच्या सुविधेसाठी काही नवीन बदल केलेले आहे. त्यामध्ये रेल्वे येण्यापूर्वी प्रवाशांचा सिटिंग चार्ट रेल्वे स्थानकावर लागतो. यानंतर कुठलीही तिकीट काढता येत नव्हती. आता हा चार्ट लागल्यानंतर जागा रिकामी असेल तर रेल्वे स्थानकावरून ते तिकीट काढता येणार आहे. - संदीप दुधे, रिझर्वेशन सुपरवायजर  

 

टॅग्स :railwayरेल्वे