ग्रामसेवक युनियनचे स्नेहमीलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:39 AM2021-03-07T04:39:07+5:302021-03-07T04:39:07+5:30

जिल्हा संघटनेच्यावतीने माजी जिल्हाध्यक्ष एस.पी. ढोकने, एस. के. जाधव, माणिकराव मस्के, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी संजय ईश्वरकर यांचा शाल, श्रीफळ ...

Enthusiasm of Gramsevak Union | ग्रामसेवक युनियनचे स्नेहमीलन उत्साहात

ग्रामसेवक युनियनचे स्नेहमीलन उत्साहात

Next

जिल्हा संघटनेच्यावतीने माजी जिल्हाध्यक्ष एस.पी. ढोकने, एस. के. जाधव, माणिकराव मस्के, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी संजय ईश्वरकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेचे आधारस्तंभ विजयराव देशमुख, जिल्हाध्यक्ष हिम्मतराव म्हातारमारे, सरचिटणीस मंगेश गाऊत्रे, कोषाध्यक्ष संजय वानखडे, पतसंस्था सचिव आश्विन तांबडे व सोळाही तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. लेखा परीक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊ हिंगणकार व जिल्हा पदाधिकारी भाऊ राठोड साहेब यांची विशेष उपस्थिती होती.

प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हिम्मतराव म्हातारमारे, संचालन मंगेश गाऊत्रे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांचे मनोमिलन करणे, समस्यांवर सकारात्मक चर्चा करून समस्या निकाली काढणे, जिल्हा दौऱ्याची आखणी करणे, संघटनेच्या सर्व सभासदांना सक्रिय करणे, सभासद नोंदणी अभियान राबविणे, संवादांची आदानप्रदान करणे, संघटनेला आई मानून संघटनेशी प्रामाणिक राहणे व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. आभार कार्याध्यक्ष कैलास जाधव यांनी मानले. अशोक राठोड, विनोद उमरतकर, सतीश काळे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Enthusiasm of Gramsevak Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.