साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:27 IST2026-01-06T19:22:24+5:302026-01-06T19:27:52+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाशी लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. त्याने दोन वेळा तरुणीवर बलात्कार केला आणि हुंड्याचे पैसे आताच आधीच द्या म्हणत लग्न मोडले.

साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
Crime News: खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या यवतमाळमधील तरुणीचे छत्रपती संभाजीनगरमधील तरुणासोबत लग्न जुळले. बोलणी झाली. हुंड्याची रक्कमही ठरली. त्यानंतर यवतमाळात त्या दोघांचा साखरपुडा सोहळा झाला. लग्नाच्या तयारीला वेग आला. त्यात मुलीच्या घरी पूजा ठेवण्यात आली होती, त्या पूजेसाठी तो यवतमाळला आला. त्यावेळी घरी कोणी नसताना तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर एकदा प्रवासातही बलात्कार केला. हे सगळं घडल्यानंतर त्याने हुंड्याचे पैसे आताच द्या म्हणत लग्न मोडले.
या प्रकरणी पीडित मुलीने लोहारा पोलिसात ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तरुणासह हुंड्याची मागणी करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार, नक्की काय घडलं?
लोकेश राजेंद्र तोनगिरे (२७) असे होणाऱ्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लोकेशचे यवतमाळमधील तरुणीसोबत लग्न ठरले होते. दोघांच्या कुटुंबीयांमध्ये बोलणी झाली. त्यानुसार त्याचा साखरपुडाही करण्यात आला. साखरपुड्यानंतर तरुणीच्या घरी पूजा ठेवण्यात आली होती. त्यासाठी लोकेश तिच्या घरी गेला होता.
घरी कुणी नसताना लोकेशने तरुणीवर बळजबरी केली आणि अत्याचार केला. त्यानंतर एकदा दोघे सोबत प्रवास करत असतानाही त्याने तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप मुलीने केला आहे.
सात लाख हुंडा आताच द्या, नाहीतर लग्न मोडू
मयूर राजेंद्र तोनगिरे, सुरभ मयूर तोनगिरे, मोहिनी राजेंद्र तोनगिरे, अर्चना संदीप तोनगिरे, संदीप भाऊलाल तोनगिरे, मनीष जीवनालाल यांनी लग्न खर्चासाठी लागणारे सात लाख रुपये एकाच वेळी द्या अन्यथा लग्न मोडेल, असे सांगितल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.
मुलीच्या साखरपुडा सोहळ्यावर तिच्या कुटुंबीयांनी यवतमाळात ४ लाख रुपये खर्च केले. नंतर लग्नासाठी मुलाला ७ लाख रुपये देण्याचे ठरल होते. ही रक्कम एकाच वेळी देणे शक्य नसल्याने टप्प्याटप्याने देण्याचा प्रयत्न मुलीच्या आईकडून केला जात होता.
मुलीच्या आईवडिलांचे म्हणणे ऐकून न घेता तरुणाने त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर आम्ही लग्न मोडत आहोत, असे थेट तिच्या आईवडिलांना सांगितले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली आणि लोकेशविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.