शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातील डोहात बुडून माय-लेकाचा अंत

By admin | Updated: October 6, 2014 23:19 IST

डोहातील पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलाला पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या मातेला त्यामध्ये अपयश आले. त्यातूनच मुलगा आणि आईचा बुडून मृत्यू झाला. हृदय हेलावून सोडणारी ही घटना पुसद

सेवादासनगरची घटना : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी अंत पुसद : डोहातील पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलाला पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या मातेला त्यामध्ये अपयश आले. त्यातूनच मुलगा आणि आईचा बुडून मृत्यू झाला. हृदय हेलावून सोडणारी ही घटना पुसद तालुक्यातील सेवादासनगर येथे घडली. विशेष म्हणजे सदर महिला ही पाहुणपणाला माहेरी आली होती. रंजना नामदेव जाधव (३२) आणि महेश नामदेव जाधव (१०) रा. लाखखिंड ता. दारव्हा अशी मृत माय-लेकांची नावे आहे. रंजना आपल्या महेश या मुलासोबत पाहुणपणासाठी माहेरी आली होती. शनिवारी दुपारी ती आपली आई शकुंतला राठोड, मुलगा महेश सोबत गावाजवळ असलेल्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेली. कपडे धुत असताना महेश नाल्याच्या तीरावर खेळत होता. अचानक महेश पाण्यात पडला. हा प्रकार लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी रंजनाने डोहात उडी घेतली. मात्र तिलाही पोहणे येत नसल्याने तीही गटांगळ्या खाऊ लागली. हा प्रकार आई शकुंतलाला दिसताच तिने जीवाच्या आकांताने डोहात उडी घेतली. मुलीला आणि नातवाला वाचविण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला. तोपर्यंत घटना गावात माहीत झाली. गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. शकुंतलाने डोहातून रंजना व महेशला तोपर्यंत बाहेर काढले होते. गावकऱ्यांनी तत्काळ पुसद येथील रुग्णालयाकडे या दोघांना घेऊन धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी रंजना व महेशला मृत घोषित केले. या घटनेची माहिती होताच लाखखिंड येथील तिच्या पतीसह नातेवाईकांनी धाव घेतली. या प्रकरणी रवींद्र चरण राठोड यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)