शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आठ नगरपरिषदेत जूनमध्ये खांदेपालट

By admin | Updated: May 21, 2014 00:00 IST

जिल्ह्यात आठ नगरपरिषदांमधील अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जुन रोजी संपुष्टात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी आतापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यवतमाळ, पुसद, वणी,

यवतमाळ : जिल्ह्यात आठ नगरपरिषदांमधील अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जुन रोजी संपुष्टात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी आतापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यवतमाळ, पुसद, वणी, आर्णी, घाटंजी, दिग्रस, दारव्हा, उमरखेड येथील नगरध्यक्षाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्या पूर्वीच नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. नगर प्रशासन विभागाकडून अध्यक्ष निवडण्याचा कार्यक्रम जाहीर झाला नसली तरी कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी अपेक्षित संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी डावपेच आखले जात आहे. आठपैकी चार नगरपरिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित आहे. यापूर्वी वणी, उमरखेड, पुसद येथे महिला नगराध्यक्ष होत्या. नव्या आरक्षणातही वणी, उमरखेड, पुसद आणि घाटंजी येथे महिलांना अध्यक्ष म्हणूून आरक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८९ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी ४७, शिवसेना ४३, मनसे आठ, बसपा चार आणि अपक्ष १५ नगरसेवक आहेत. सध्या यवतमाळ मध्ये भाजप- राष्ट्रवादीत- बसपा सत्तेत आहे. पुसद येथे राष्ट्रवादी - शिवसेना, वणी येथे काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना-अपक्ष, घाटंजी येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पांढरकवडा, उमरखेड, आर्णी, दिग्रस येथे काँग्रेसचे पुर्ण बहुमत आहे. मात्र ज्या नगरपरिषदेत पूर्ण बहुमत नाही. तेथे नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी करणार्‍यांची संख्या अधिक आहे. अध्यक्षपदासाठी घोडेबाजार होणार असल्याने पक्षाच्या विरोधात जाऊनही नगरसेवकांची भूमिका राहण्याची शक्यता आहे. यवतमाळ मध्ये यापूर्वी अशी बंडखोरी झाली आहे. हीच बंडखोरी नव्याने होऊ घातलेल्या निवड प्रक्रियेतही कायम राहते काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)