ईद-ए-मिलादने दिला एकतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:37+5:30

स्थानिक कळंब चौकातून ईद-ए-मिलादचा जुलूस निघाला. या जुलूसमध्ये हजारो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीतील ध्वजामध्ये भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता. यासोेबतच भगव्या आणि पांढºया रंगात चंद्र, तारा प्रतिबिंबित करण्यात आले होते. यातून सामाजिक एकतेचा संदेश मिळाला.

Eid-e-Milad gave a message of solidarity | ईद-ए-मिलादने दिला एकतेचा संदेश

ईद-ए-मिलादने दिला एकतेचा संदेश

Next
ठळक मुद्देमिठाई वाटप: जुलूसमध्ये भगव्या आणि पांढऱ्या रंगात दिसला चंद्र-तारा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जगाला प्रेम, अहिंसा व शांततेचा संदेश देणाºया प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून रविवारी जिल्हाभरात उत्साहात साजरा झाला. यवतमाळात यानिमित्ताने आयोजित मिरवणुकीमधून राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडले. समाज बांधवांनी मिठाई वाटून उत्सव साजरा केला.
स्थानिक कळंब चौकातून ईद-ए-मिलादचा जुलूस निघाला. या जुलूसमध्ये हजारो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीतील ध्वजामध्ये भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता. यासोेबतच भगव्या आणि पांढºया रंगात चंद्र, तारा प्रतिबिंबित करण्यात आले होते. यातून सामाजिक एकतेचा संदेश मिळाला.
या जुलूसचे विविध ठिकाणी स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी झाली. यासोबत फुलांचाही वर्षाव झाला. मिठाई वाटून स्वागतही करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराही लावण्यात आला होता. पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला. दरम्यान, सर्व समाजबांधवांनीही पूर्ण सहकार्य करीत शांततेत उत्सव साजरा केला. धुमालशाह वली बाबाच्या दर्ग्यावरही यावेळी अनेकांनी दर्शन घेतले. जुलूसमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. एकमेकांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तेलीपुºयात या जुलूसचा समारोप झाला. यावेळी अलरजा मशिदच्या इमामांनी समाजबांधवांना पैगंबरांचे विचार सांगितले. या ठिकाणी प्रसाद वितरण करण्यात आला.

मक्का मदिनाची प्रतिकृती
जुलूसमध्ये हजमधील मक्का मदिनाची प्रतिकृती पहायला मिळाली. यासोबतच नाराये तकदीर अल्लाहू अकबर अशा स्वरूपाचे नारे एकायला मिळाले. इस्लामध्वज चौफेर फिरविताना त्यावर तिरंग्याचे प्रतिकही चांद ताऱ्यांसह पहायला मिळाले.

Web Title: Eid-e-Milad gave a message of solidarity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.