अर्थव्यवस्था डळमळीत, पण सहजीवनाचा आनंदही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:22+5:30

कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रत्येकातच मानवी दृष्टिकोन विकसित होत आहे. पूर्वी विविध समाजाचे सण-उत्सव मिरवणुका व फलकबाजी करून साजरे केले जात होते. यातून त्या-त्या शहरात, गावात जातीमध्ये, समुदायात एक प्रकारची स्पर्धा चालत होती. आता ही स्पर्धा नसून आदरभाव वाढला आहे. प्रत्येकजण आपल्या समुदायापलीकडे जावून मदतीचे वाटप करीत आहे.

The economy is shaky, but so is the joy of coexistence | अर्थव्यवस्था डळमळीत, पण सहजीवनाचा आनंदही

अर्थव्यवस्था डळमळीत, पण सहजीवनाचा आनंदही

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनची दुसरी बाजू : जातीय सलोखा जिल्हाभर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनने संपूर्ण समाजजीवन ढवळून निघाले आहे. सार्वजनिक आणि कौटुंबिक सहजीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेला हादरे जरी जाणवत असले तरी माणसा-माणसातील सलोखा मात्र वाढला आहे. यवतमाळातील गेल्या चार-पाच महिन्यातील लॉकडाऊन काळात याचे पडसाद प्रामुख्याने जाणवले.
कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रत्येकातच मानवी दृष्टिकोन विकसित होत आहे. पूर्वी विविध समाजाचे सण-उत्सव मिरवणुका व फलकबाजी करून साजरे केले जात होते. यातून त्या-त्या शहरात, गावात जातीमध्ये, समुदायात एक प्रकारची स्पर्धा चालत होती. आता ही स्पर्धा नसून आदरभाव वाढला आहे. प्रत्येकजण आपल्या समुदायापलीकडे जावून मदतीचे वाटप करीत आहे. एप्रिल महिन्यात झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमी एका आठवड्यात आली होती. हे दोन्ही उत्सव यवतमाळ शहरात प्रचंड मिरवणूक काढून व शोभायात्रेने साजरे केले जातात. यावर्षी मात्र हा खर्च टाळून मिरवणुकीची रक्कम गरजू व गरिबांना मदत देण्यावर खर्च करण्यात आली. याचा दुहेरी फायदा झाला. कुठेतरी निर्माण होणारी तेढ, स्पर्धा थांबली व आदरभाव वाढला. हा या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आॅनलाईन शिक्षण धोक्याचे
इयत्ता दहावी व बारावीतील मुलांना आॅनलाईन शिक्षणाच्या नावाने मोबाईल पुरविल्या जात आहे. यात काही मुले आपल्या अभ्यासक्रमाची लिंक आली नाही, असे सांगून पालकांची दिशाभूल करीत आहे. या मुलांकडूनही काही प्रमाणात आॅनलाईन गुन्हे होण्याची शक्यता वाढली आहे. कॉम्प्युटर व लॅपटॉपच्या डेस्कटॉपवर येणारी लिंक सुरक्षित मानली जाते. यामुळेच आॅनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कौटुंबिक वादाचे प्रसंग मात्र वाढले
घराबाहेर पडणेच शक्य नसल्याने व पती, वडील पूर्ण वेळ घरात असल्याने अनैतिक संबंधांना आळा बसला आहे. यातून होणारे गुन्हेही कमी झाले आहे. मात्र कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहणारा पती, वडील लॉकडाऊन काळात अधिक काळ घरात घालवित असल्याने वादाचे प्रसंगही वाढले आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबात एकत्र आल्याचा आनंद दिसत होता. नंतर मात्र त्याची जागा कुरबुरीने घेतली. काही प्रमाणात कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसते.

Web Title: The economy is shaky, but so is the joy of coexistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.