शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची बदली झाल्यानंतर अद्यापही हे पद भरले गेले नाही. या पदाचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर या विभागातील उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले. ही दोन पदेही अद्याप रिक्तच आहे.

ठळक मुद्देमहत्त्वाची पदे रिक्त : सर्वत्र प्रभाराचे अधिराज्य, अधीक्षकाने दिला स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. या विभागातील सर्वच महत्वाची पदे रिक्त असल्याने कामांवर विपरित परिणाम होत आहे.तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची बदली झाल्यानंतर अद्यापही हे पद भरले गेले नाही. या पदाचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर या विभागातील उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले. ही दोन पदेही अद्याप रिक्तच आहे. शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी ही दोन्ही महत्वाची पदे प्रभारावर असल्याने या विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. प्रशासनावर कुणाचाही वचक उरला नाही. परिणामी कर्मचारी बेलगाम झाले आहे.शिक्षण विभागात कक्ष अधिकाºयाचे एक पदही रिक्त आहे. याशिवाय राजपत्रित अधीक्षकाचे एक पद रिक्त आहे. एक अधीक्षक कार्यरत आहे. मात्र त्यांनीही दीड महिन्यांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनाही येत्या एक-दीड महिन्यात स्वेच्छानिवृत्ती मिळण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे शिक्षण विभागातील सर्वच महत्वाची पदे रिक्त होणार आहे. केवळ प्रभार देऊन गाडा हाकलण्याचे काम सुरू आहे. शासन स्तरावरून पदे भरली जात नसल्याने विभागाच्या कामकाजात खोडा निर्माण होत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण राहत नाही. प्रभारी अधिकारी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे एकूणच या विभागाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.दोन महिन्यांपासून वेतन रखडलेशिक्षण विभागात जबाबदार अधिकारी नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडले आहे. अद्यापही त्यांना नोव्हेंबरचे वेतन मिळाले नाही. आॅनलाईनमुळे या वेतनात बाधा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा सर्वात मोठा विभाग म्हणून शिक्षण विभागाची ओळख आहे. या विभागात शिक्षकांसह जवळपास दहा हजार कर्मचारी कार्यरत आहे. मात्र एवढा महत्वाचा विभाग प्रभारावर असल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद