शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांच्या प्रश्नांवर चर्चा

By admin | Updated: October 11, 2015 00:45 IST

जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने यवतमाळ शहर आणि तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी सभा घेण्यात आली.

यवतमाळ : जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने यवतमाळ शहर आणि तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेत मुख्याध्यापकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी करावयाची तयारी आदी बाबी या सभेत मांडण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांनी यावर आपले मत मांडले. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रकाश भुमकाळे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष विनोद संगीतराव, मुरलीधर धनरे, कृती समितीचे अध्यक्ष नीरज डफळे, उपक्रम समिती प्रमुख विजय विसपुते, विदर्भ प्रतिनिधी पांडुरंग साखरकर, सचिव भुमन्ना बोमकंटीवार, जिल्हा उपाध्यक्ष नागोराव चौधरी, रवींद्र दूरशेटवार, मंगला वडदकर, संगीता डांगे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकारिणी निवडण्यात आली. शहर कार्यकारिणीत अध्यक्ष शिलाताई कोकाटे, सचिव एम.जी. धवने, सहसचिव अरविंद मांजरे, उपाध्यक्ष इमरान अहमद अब्दुर रहमान, कविता बुटे, प्रणीता देशपांडे, संगीता वेणूरकर, रहमत खान, शेखर गुल्हाने यांचा समावेश आहे. तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी अमृत खेडकर, सचिव देवदत्त भोयर, सहसचिव सुरेंद्र शिंदे, उपाध्यक्ष ताराचंद चव्हाण, कल्पना उघडे, महिला प्रतिनिधी ममता देव, निलिमा गेडाम, किशोर चव्हाण, तालुका प्रतिनिधी प्रेमसिंग राठोड, दबीर उल्लाखान यांनी निवड झाली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. सभेला भीमराव गायकवाड, यशवंत ताजणे, कांचन देशमुख, एन.एल. आडे आदींची उपस्थिती होती. कार्यकारिणीमध्ये विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना संधी देण्यात आली आहे. (वार्ताहर)