शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: September 7, 2014 00:11 IST

आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी विमा प्रमाणपत्राअभावी (एलआयसी-आयडी) योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे न मिळाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या

आम आदमी : अनेकांना अद्याप प्रमाणपत्रच मिळाले नाहीअण्णाभाऊ कचाटे - मारेगावआम आदमी विमा योजनेचे लाभार्थी विमा प्रमाणपत्राअभावी (एलआयसी-आयडी) योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे न मिळाल्याने आम आदमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीपासून ते वंचित आहेत़राज्यात शासनाने सन २००७ पासून ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आकस्मिक मृत्यू, अपंगत्व आल्यास गरीब कुटुंबांना काही आर्थिक लाभ, आधार व्हावा, म्हणून आम आदमी विमा योजना सुरू केली़ त्यावेळी ही योजना केवळ केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे केवळ ग्रामीण भूमिहीन शेतमजुरांपुरती मर्यादित होती़ महाराष्ट्र शासनाने सन २००८ मध्ये त्यात सुधारणा करून शेतमजुरांशिवाय एक हेक्टर बागायती व दोन हेक्टर कोरडवाहू भूधारकांना त्यात समाविष्ट केले़ याशिवाय सदर विमा प्रमाणपत्रधारकाच्या नववी ते बारावीत शिकणाऱ्या दोन अपत्यांना दरमहा १०० रूपये शिष्यवृत्ती लागू केली़ लाभार्थ्यांना या योजनेसाठी कोणताच विमा हप्ता भरावा लागत नाही़शासन दरवर्षी या योजनेसाठी कोट्यवधी रुपये विमा कंपनीकडे हप्ता म्हणून भरते. असे असले तरी, या योजनेचा प्रचार व प्रसाराअभावी आणि विमा प्रमाणपत्रांअभावी शेकडो लाभार्थी वंचित आहेत. तसेच ते योजनेबाबत अनभिज्ञ आहे. प्रशासन मात्र सुस्त आहे़ तालुक्यात महसूल रेकॉर्डनुसार या योजनेचे सात हजार १४ लाभार्थी आहे. त्यातील पाच हजार ७१२ लाभार्थ्यांना (एलआयसी-आयडी) विमा प्रमाणपत्रे मिळाली आहेत. एक हजार ३०२ लाभार्थी अद्याप या प्रमाणपत्रांपासून अद्याप वंचितच आहे़ विमा प्रमाणपत्र व (एलआयसी-आयडी) क्रमांकाशिवाय लाभार्थ्यांना मृत्यू दावा, अपघाती दावा तसेच त्यांच्या पाल्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरता येत नाही़ तालुक्यात २० माध्यमिक व १० कनिष्ठ माध्यमिक महाविद्यालयात सन २०१४-१५ या वर्षात नववी ते बारावीमध्ये पटावर असणाऱ्या तीन हजार ४१५ विद्यार्थ्यांपैकी केवळ एक हजार ३९० विद्यार्थी आम आदमी शिष्यवृत्तीस पात्र आहेत़ त्यातील केवळ २९५ विद्यार्थ्यांकडे पालकांचे विमा प्रमाणपत्रे आहेत़ तेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करीत आहे. उर्वरित ५१९ विद्यार्थ्यांकडे विमा प्रमाणपत्रे नसल्याने ते योजनेच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़आम आदमी शिष्यवृत्तीपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विमा प्रमाणपत्र आहे, किंवा ज्यांनी इंटरनेटवरून विमा क्रमांक मिळविला, त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज शाळांकडून भरले जात आहे. तथापि ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विमा प्रमाणपत्र नाहीत किंवा ज्यांच्याकडे विमा क्रमांक नाही, अशा विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांच्या वडिलांचा विमा लाभाचा अर्ज व शिष्यवृत्तीचा अर्ज भरून द्यावा़ त्यासाठी वर्ग शिक्षक, मुख्याध्यापकांनी तलाठ्यांच्या सहकार्याने वेळ देऊन विद्यार्थी पालकांचे अर्ज अपलोड करावे, सर्व अर्ज तपासून तलाठी व मुख्याध्यापक प्रमाणीत करतील व तहसील कार्यालय सेतू केंद्रात सादर करतील़ तहसीलदार हे सर्व अर्ज आॅनलाईन तपासतील व परिपूर्ण अर्ज महा ई-मेलने विमा कार्यालयास पाठवतील, अशा लाभार्थ्यांना विमा प्रमाणपत्र व विमा क्रमांक प्राप्त होऊन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरेणार आहे. मात्र ही प्रक्रिया जटील असल्याने व सर्वत्र आॅनलाईन सुविधा नसल्याने सदर योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रशासनाने या योजनेचे फलक व कारवाईची माहिती कार्यालयातील दर्शनी भागात नागरिकांच्या माहितीसाठी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांना योजनेची माहिती मिळणे सुलभ होणार आहे.