शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनी मंत्रालयात’ अखेर महाविकास आघाडी ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. सत्तेचा हाच पॅटर्न राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय या आघाडीने घेतला आहे. यामुळे राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, पंचायत समित्या एवढेच नव्हे तर सहकार क्षेत्रातसुद्धा सत्तेचे नवे समीकरण नावारुपास येणार आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा अध्यक्ष : भाजप जिल्हा परिषदेच्या सत्तेबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याची ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण बसविताना शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाविकास आघाडी कायम ठेवण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपला सत्तेच्या बाहेर रहावे लागण्याची चिन्हे आहेत.राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. सत्तेचा हाच पॅटर्न राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय या आघाडीने घेतला आहे. यामुळे राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, पंचायत समित्या एवढेच नव्हे तर सहकार क्षेत्रातसुद्धा सत्तेचे नवे समीकरण नावारुपास येणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजप-शिवसेना व काँग्रेसची सत्ता आहे. सुरुवातीची दोन वर्षे सेनेच्या सर्वाधिक जागा असूनही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून सेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. परंतु आता नव्या समीकरणात भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गात आणि त्यातही महिलेसाठी राखीव आहे. शिवसेना (२०), काँग्रेस (११ + १) आणि राष्ट्रवादी (११) यांची महाआघाडी स्थापन झाल्यास एकूण ४३ संख्याबळ जुळते आणि सत्ता स्थापनेसाठी ते पुरेसे आहे. राज्यातील सत्तेचा पॅटर्न कायम राहिल्यास अध्यक्षपद शिवसेनेकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि किमान दोन सभापती काँग्रेसकडे असा जागा वाटपाचा फार्म्युला राहू शकतो. परंतु राष्ट्रवादीपेक्षा आपली एक जागा अधिक असल्याचे सांगून काँग्रेस उपाध्यक्ष पदावर दावा करण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.भाजपचे सर्वत्रच नुकसानजिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी पाच जागा भाजपने खेचून आणल्या आहेत. दोन नवे चेहरे निवडून आणत पाचही जागा भाजपने कायम राखल्या. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली असती तर भाजपला किमान दोन कॅबिनेट जिल्ह्याला मिळाले असते. जुन्या सरकारमध्ये भाजपकडे जिल्ह्यात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद होते. परंतु आता विरोधात बसावे लागत असल्याने भाजपचे मंत्री पदाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पाच जागा असूनही विरोधी बाकावर बसण्याची वेळ भाजपवर आली आहे. जिल्हा परिषदेमध्येसुद्धा भाजपला सक्षम विरोधी पक्षाची भूमिका वठवावी लागण्याची चिन्हे आहे. शिवसेनेने खालोखाल १८ जागा भाजपच्या आहेत. दोन वर्ष भाजपने सेनेला सत्तेबाहेर ठेवले. आता सेनेच्या नेतृत्वातील महाआघाडी भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेबाहेर ठेवणार आहे. यानिमित्ताने राजकीय हिशेब येथेच चुकता होणार असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद