शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा मंचचा निर्धार

By admin | Updated: October 6, 2015 03:20 IST

पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी

पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला प्रारंभ केला असून सोमवारी माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट दिली. त्यावेळी अन्नत्याग सत्याग्रह थांबवा, अशी विनंती केली. मात्र लोकहितार्थ निर्धारित तारखेपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्धार पुसद विकास मंचने यावेळी केला. अन्नत्याग सत्याग्रहाच्या चौथ्या दिवशी पुसद विकास मंचचे अ‍ॅड.सचिन नाईक, शाकीब शहा, अभिलेश खैरमोडे यांच्यासह पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.वजाहत मिर्झा, महेंद्र मस्के ही मंडळी या सत्याग्रहात सहभागी झाली आहे. चार दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह करणारे अ‍ॅड.सचिन नाईक यांची प्रकृती खालावली. सोमवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष अण्णासाहेब ठेंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रतिराव राऊत, पंचायत समिती उपसभापती विवेक मस्के, जिल्हा परिषद सदस्य माधवी पाटील, साहेबराव कदम, सीताराम ठाकरे, गुलाबराव जाधव, गोदावरी जाधव, आशाताई पांडे, आशा चव्हाण, अ‍ॅड.माधव माने, दीपक आसेगावकर, डॉ.उत्तम रुद्रवार, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, महेश खडसे यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या. दरम्यान, माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रहस्थळाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, पुसद जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाची कठोर भूमिका घेतली. पुसद जिल्हा करण्यास मी स्वत: विकास मंचच्या चळवळीत सहभागी आहे. मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन पुसद जिल्हा निर्मितीबाबत चर्चा करू. लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत पुसद विकास मंचची बैठक घडवून आणणार आहो. या बैठकीला आपण उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले. नेते, समाजसेवी मोठ्या संख्येने सत्याग्रहाला भेट देवून जिल्हा निर्मितीला पाठिंबा दर्शवित आहे. बार असोसिएशनने जिल्हा निर्मितीचा ठराव करून विकास मंचच्या सुपूर्द केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.कैलास राठोड, अ‍ॅड.माधवराव माने, अ‍ॅड.प्रशांत देशमुख, अ‍ॅड.विवेक पांडे, अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निशांत बयास, धनंजय सोनी, अभय गडम, पंकज पारधे, राहुल कांबळे, किरण देशमुख, नारायण पुलाते, कैलास जगताप, रवी ग्यानचंदाणी, सुरज डुबेवार, संजय भंडारी, निखिल चिद्दरवार, अ‍ॅड. नसरूल्ला खान, अजय क्षीरसागर, देवेंद्र खडसे, डॉ.उमेश रेवणवार आदी परिश्रम घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)