मागण्यांसाठी शिक्षक समितीचे धरणे

By Admin | Updated: March 12, 2015 02:19 IST2015-03-12T02:19:30+5:302015-03-12T02:19:30+5:30

राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करून आश्वासनांची कालमर्यादा न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक..

Demand for teacher's demands | मागण्यांसाठी शिक्षक समितीचे धरणे

मागण्यांसाठी शिक्षक समितीचे धरणे

यवतमाळ : राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करून आश्वासनांची कालमर्यादा न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार येथील जिल्हा परिषदेसमोर सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी आंदोलन मंडपास भेट देवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात किशोर सरोदे, विलास गुल्हाने, देवेंद्र चांदेकर, हरिदास कैकाडे, अशोक मोहुर्ले, राधेश्याम चेले, मोहन बाबरे, गणेश देऊळकर, राजेंद्र उमाटे, मधुसुदन कोवे, देवराव बोकडे, गजानन यादव, पुंडलिक देवतळे, सुनील भोयर आदींसह शिक्षक समितीचे असंख्य पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for teacher's demands