शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसच्या शेतकऱ्यांना पीक पंचनाम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

तालुक्यातील संपूर्ण पंचनामे करण्यासाठी १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतातच पीक कसे ठेवायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सवड नाही. राजकीय कलगीतुऱ्यात गुरफटलेल्या सरकारला याचे सोयरसूतक नाही.

ठळक मुद्देप्रशासन उदासीन : परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : परतीच्या पावसाने तालुक्यात कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. कापून ठेवलेल्या सोयाबीनला आता उग्र वास सुटला आहे. मात्र महसूल व कृषी विभाग पंचनाम्याची प्रक्रिया कासवगतीने करीत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि भरपाई कधी मिळणार, या विवंचनेत कास्तकार सापडले आहे.तालुक्यातील संपूर्ण पंचनामे करण्यासाठी १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतातच पीक कसे ठेवायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सवड नाही. राजकीय कलगीतुऱ्यात गुरफटलेल्या सरकारला याचे सोयरसूतक नाही.एकीकडे जमिनीतील जास्त ओलाव्यामुळे रबीचा हंगाम दूर जाणार असल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे कास्तकार मदत कशी व कुठून मिळेल, या विचारचक्रात गुरफटला आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शनाबाबत कोणताच दिलासा देऊ शकला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा एकाकी पडल्याचे चित्र आहे. अनेक गावात कास्तकारांनी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामा करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री किसान योजनेतील सन्मान निधीच्या वितरणातील त्रुटी कास्तकारांचा सन्मान कमी, अपमानच अधिक करत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे केवळ नाटक न करता सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.लोकप्रतिनिधी आहेत कुठे ?तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. अशावेळी या मतदारसंघाचे खासदार, आमदार कुठे आहेत, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे. लोकप्रतिनिधींचे कास्तकारांकडे झालेले दुर्लक्ष व कृषी प्रशासनावर त्यांचा फुसका दबाव कास्तकारांमध्ये रोष वाढवित आहे. एकंदरीत सरकार स्थापनेतील कलगीतुऱ्यात शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे शेतकरी राजकीय पक्षांना हिसका दाखविण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती