पैनगंगेच्या डोहात बुडून बालिकेचा मृत्यू

By Admin | Updated: June 4, 2016 02:08 IST2016-06-04T02:08:54+5:302016-06-04T02:08:54+5:30

आईसोबत कपडे धुण्यासाठी पैनगंगा नदीवर गेलेल्या एका १० वर्षीय बालिकेचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

The death of her daughter drowns in the gang of panganga | पैनगंगेच्या डोहात बुडून बालिकेचा मृत्यू

पैनगंगेच्या डोहात बुडून बालिकेचा मृत्यू

उमरखेड : आईसोबत कपडे धुण्यासाठी पैनगंगा नदीवर गेलेल्या एका १० वर्षीय बालिकेचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, गावकरी प्रेत घेऊन उमरखेड शासकीय रुग्णालयात आले असता डॉक्टरांनी त्यांना दोन तास ताटकळत ठेवले.
शिवाणी दिगांबर कदम असे मृत बालिकेचे नाव आहे. ती शुक्रवारी सकाळी १० वाजता आपल्या आईसोबत पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेली. डोहाच्या तिरावर कपडे धुत असताना शिवाणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. यावेळी आरडाओरडा केल्याने नागरिक धावून आले. परंतु उपयोग झाला नाही. १५ मिनिटानंतर तिचा मृतदेहच हाती लागला. दरम्यान गावकऱ्यांनी मृतदेह घेऊन येथील शासकीय रुग्णालय गाठले. परंतु त्या ठिकाणी डॉ. रमेश मांडण यांनी प्रेत घेण्यास नकार दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या प्रकाराची तक्रार पोलीसात दिली. वृत्त लिहेस्तोवर गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The death of her daughter drowns in the gang of panganga