शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पहूर-पांगरी पांदण रस्त्याची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रस्ता तूर्तास ये-जा करण्यायोग्य झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तात्पुरती व्यवस्था झाली. यामुळे शेतकरी व महिला या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ याची प्रचिती ग्रामस्थांनी आणून दिली. एकीचे बळ त्यांनी दाखवून दिले. मात्र प्रशासन अद्याप उदासीन आहे. त्यामुळे संतापही व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे हाल : पावसामुळे बिकट, लोकवर्गणीतून दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या पहूर ते पांगरी शेतशिवाराकडे जाणारा पांदण रस्ता दयनीय झाला आहे. पोळ्यापासून दररोज पाऊस सुरू असल्याने रस्त्याची दुरावस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.हा पांदण रस्ता पूर्णत: काळ्या मातीचा आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. या चिखलात बैलबैंडी चाकापर्यंत फसत आहे. चिखलाने माखलेल्या रस्त्यावरुन पायदळ चालणे कठीण झाले आहे. शेतात खत कसे न्यावे, मजूर काम करायला कसे जातील, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निद्रीस्त अवस्थेमुळे पालकमंत्री पांदण योजना कुचकामी ठरत आहे. ‘आमच्या गावात आमचे सरकार’ म्हणत काही होतकरू तरूण शेतकºयांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून ट्रॅक्टर भाड्याने करून विकत दगड, मुरुम आणून दिवसभर श्रमदान करून रस्त्यावर दगड पसरविले. त्यावर मुरूम टाकून पांदण रस्ता दुरुस्त केला. मात्र दगड, मुरूम आणणारा ट्रॅक्टरच चिखलात फसल्याने त्यांची निराश झाली. अखेर ‘साथी हाथ बढाना’ म्हणत युवा शेतकºयांनी ‘दे धक्का’ करून ट्रॅक्टर कसाबसा चिखलातून बाहेर काढला.लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रस्ता तूर्तास ये-जा करण्यायोग्य झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तात्पुरती व्यवस्था झाली. यामुळे शेतकरी व महिला या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ याची प्रचिती ग्रामस्थांनी आणून दिली. एकीचे बळ त्यांनी दाखवून दिले. मात्र प्रशासन अद्याप उदासीन आहे. त्यामुळे संतापही व्यक्त केला जात आहे. पांदण रस्ता दुरुस्तीसाठी गुणवंत तिरपुडे, विजय जंगले, मधुकर तिरपुडे, यशवंत शेंडे, गजानन तिरपुडे, देविदास डांगे, पांडुरंग राठोड, बाळू राठोड, विठ्ठल कंठाणे, गजानन जांभुळकार, किसन पडोळे, सुरेश पडोळे आदी शेतकºयांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी