शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी गर्दी

By admin | Updated: January 18, 2017 00:03 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी काँग्रेसने सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

नेत्यांसमोर ‘प्रझेंटेशन’: सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी काँग्रेसने सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी काँग्रेस कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. येत्या १६ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ६१, तर पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसने इच्छुकांना मुलाखतीसाठी पाचारण केले होते. यात पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, पुसद, यवतमाळ आणि घाटंजी या सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी पार पडल्या. पक्ष निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार कीर्ती गांधी व विजय खडसे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिन नाईक, वजाहत मिर्झा, राहुल ठाकरे, तातू देशमुख, मोहम्मद नदीम, देवानंद पवार, अरूण राऊत आदींच्या संसदीय मंडळाने त्यांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक तालुक्यातील संबंधित जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना मंडळाने आत्तापर्यंत कोणती पदे भूषविली, किती वर्षांपासून पक्षात काम करीत आहात, उमेदवारी तुम्हालाच का द्यावी, आदी प्रश्न केले. प्रत्येक गटासाटी किमान पाच इच्छुकांनी पक्षाकडे दावा केल्याचे सांगण्यात आले. गटनिहाय या मुलाखती पार पडल्या. बाहेर इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. दर पंचवार्षिक प्रमाणेच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच दिसून येत होती. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. गुरूवारी उर्वरित नऊ तालुक्यांमधील इच्छुकांच्या मुलाखतींचे सोपस्कार पार पाडले जाणार आहे. आता काँग्रेस कुणाला जिल्हा परिषदेची उमेदवारी देते याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी) माजी राज्यमंत्र्यांनी फिरविली पाठ माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी या मुलाखतींकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संजय खोडके यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी अमरावतीला गेले होते. उमरखेडमध्ये सर्वाधिक चुरस सात तालुक्यांपैकी उमरखेड तालुक्यात सर्वाधिक चुरस होती. या तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वाधिक ९० इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली. महागाव तालुक्यातून ५८, पांढरकवडा ५१, यवतमाळ ४८, आर्णी ४७, तर घाटंजी तालुक्यातून ४२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सर्वात कमी इच्छूक पुसद तालुक्यात होते. या तालुक्यातून केवळ २८ इच्छुकांनी हजेरी लावली.