शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार हेक्टरातील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 00:33 IST

जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.

ठळक मुद्देअती पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी : सोयाबीनला कोंबे फुटली, कापूस झाला जमिनदोस्त, तुरीलाही फटका

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ३४ हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यामध्ये सर्वाधिक फटका कापसाला बसला. जिल्ह्यात प्रारंभापासूनच पावसाने शेतकऱ्यांना हातघाईस आणले. पेरणी करताना पावसाने पाठ दाखविली. पिके काढताना जिल्ह्यात पाऊस अतोनात बरसला. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसासारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागाचे सर्वेक्षण झाले, तर काहींचा अहवाल अप्राप्त आहे.कापसाचे सर्वाधिक नुकसानऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस बरसला आणि कापसाची बोंड गळाली. आता कापूस घरात किती येणार, हा देखील प्रश्न आहे. पावणेपाच लाख हेक्टरवरील क्षेत्रापैकी १७ हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.४९ हजार शेतकऱ्यांना फटकाजिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आणि फळ पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या ४९ हजार २५६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय निकषानुसार हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे.दारव्हातील नुकसान मोठेजिल्ह्यात सतत बरसणाऱ्या पावसाने दारव्हा तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केली आहे. १९ हजार ३५२ हेक्टरला फटका बसला आहे. याशिवाय यवतमाळ वगळता इतर १५ तालुक्यातील पिकांना पावसाने फटका बसला आहे.संयुक्त पंचनामेपावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे संयुक्तरित्या जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.- नवनाथ कोळपकर,कृषी अधीक्षक

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस