शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उंबरठा उत्पादनावरच पीक विम्याचा लाभ

By admin | Updated: May 25, 2014 23:53 IST

जिल्ह्यात यावर्षी अतवृष्टी, परतीचा पाऊस आणि गारपिटीने अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडून दखल घेतली जाईल, अशी आशा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांना होती.

यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी अतवृष्टी, परतीचा पाऊस आणि गारपिटीने अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडून दखल घेतली जाईल, अशी आशा विमा उतरविणार्‍या शेतकर्‍यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने जाहीर केलेल्या पत्रात उंबरठा उत्पादनावर पीक विमा दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात यावर्षी तीन लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. याची दखल कृषी विभागामार्फत घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तोकडी मदत जाहीर केली. यामुळे शेतकरी हताश झाले होते. अशावेळी शेतकर्‍यांपुढे पीक विमा हाच आशेचा किरण होता. त्यामुळे शेतकरी पीक विमा आपल्या खात्यात जमा झाला का याची खात्री करण्यासाठी बँकाकडे येरझारा मारत आहेत. बँकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडेही धाव घेतली. यानंतरही शेतकर्‍यांना दिलासा न मिळाल्याने भीमराव राठोड या शेतकर्‍याने केंद्रीय कृषी सचिव आणि राज्य कृषी आयुक्तांकडे धाव घेतली.

विम्याची रक्कम द्या अथवा विम्याचा पैसा परत करा, अशा आशयाचे पत्र त्यांनी पाठविले. याची दखल घेत विमा कंपनीने पीक विमा उतरविण्याचे निकष जाहीर केले आहे. यामध्ये शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला असला तरी, त्यांचे उंबरठा उत्पादन कमी असल्यास शेतकरी पीक विम्याच्या मदतीस पात्र ठरतील, असे निकष असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गारपीट, अतवृष्टी झाल्यास ४८ तासांत याबाबतची सूचना आणि पंचनामा विमा कंपनीला सादर करणे गरजेचे होते, असेही म्हटले आहे. त्यामुळे किती शेतकरी मदतीस पात्र ठरतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा कंपनीने पीक प्रात्यक्षिक प्रयोगाच्या उंबरठा उत्पादन तपासण्याच्या प्रक्रि येला सुरुवात केली आहे, अशी माहिती अँग्रीकल्चरल इन्शूरन्स कंपनीचे सहव्यवस्थापक एम.एस. सावंत यांनी कळविली आहे. (शहर वार्ताहर )