शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा रोडवर क्रिकेट सट्टा

By admin | Updated: May 19, 2014 23:57 IST

आयपीएल क्रिकेट सामन्यांचा फिव्हर सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे. तसा क्रिकेट सट्टा बाजारही तेजीत आला आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग

पाच अटकेत : विद्यार्थ्यांचा सहभाग, नेटवर्कचा शोध

यवतमाळ : आयपीएल क्रिकेट सामन्यांचा फिव्हर सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे. तसा क्रिकेट सट्टा बाजारही तेजीत आला आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे प्रथमच उघड झाले आहे. दारव्हा मार्गावरील नवदुर्गा अर्पामेंटमध्ये धाड टाकून पोलिसांनी सट्टा खेळणार्‍या पाच जाणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून मिळालेल्या मोबाईलच्या माध्यमातून राज्यातील सटोड्यांच्या नेटवर्कचा सुगावा लावला जात आहे. रविवारच्या रात्री ९.३० वाजता सनरायझर्स हैद्राबाद विरूध्द कोलकत्ता नाईट रायर्डस असा सामना सुरू होता. यावर सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. त्यावेळी आरोपी लतेश चमेडीया (२८) रा. बाजोरियानगर, प्रितेश रमाकांत कुसुमकर (२७), नवनीत शंकर पोदुतवार (२१), वैभव नारायण माहुरे (२५), पंकज अरूण साखरकर (२१) यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून लॅपटॉप, नऊ मोबाईल, एलसीडी टीव्ही आणि रोख ९ हजार असा ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शहरात बाहेरगावरून शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थांना हेरून हा व्यवसाय केला जात आहे. शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तीही यात समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. धाडीत मिळालेल्या मोबाईलवरून राज्यातील क्रिकेट सटोड्याचे कनेक्शन हाती लागते काय याचा तपास पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक संतोष माने यांच्या नेतृत्वात सहायक उपनिरीक्षक अजय ढोले, राहुल मनवर, संतोष मडावी, प्रमोद मडावी, तुषार नेवारे, इकबाल शेख यांनी केली. आठवड्याभरात आयपीएल सट्टयावर केलेली ही दुसरी कारवाई आहे. (कार्यालय प्रतिनिधी)