शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद बदल्यांवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

प्रशासनाने १५ टक्केच्या मर्यादेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यात विविध विभागांच्या ज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाची परिस्थिती पाहाता या काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणे धोक्याचे आहे. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातील हजारो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जमण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसभागृहात गर्दीची भीती । कर्मचारी म्हणतात, अमरावतीप्रमाणे झूम वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. मात्र या प्रक्रियेसाठी कोरोना काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.प्रशासनाने १५ टक्केच्या मर्यादेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यात विविध विभागांच्या ज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाची परिस्थिती पाहाता या काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणे धोक्याचे आहे. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातील हजारो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना बोलावण्यापेक्षा अमरावती जिल्हा परिषदेने जसा या प्रक्रियेसाठी झूम अ‍ॅपचा वापर केला, तसाच यवतमाळातही वापर करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने याबाबत अध्यक्ष आणि सीईओंना निवेदन दिले. यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गावंडे, कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, सरचिटणीस दिलीप कुडमेथे, संतोष मिश्रा, भानूदास चिरडे, ताराचंद देवधरे, अनिल कानतोडे, अतुल येलके, शिल्पा मेश्राम, अनु नैताम, कमल तोडसाम आदी उपस्थित होते.नांदेडमध्ये स्थगितीदरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता नांदेड जिल्हा परिषदेने गट क आणि ड संवर्गाच्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया स्थगित केली आहे. यवतमाळमध्ये प्रक्रिया स्थगित करू नये, मात्र गर्दी टाळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली