कोरोनाने उघडा झाला ‘एसटी’च्या यवतमाळ विभागाचा खरा चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:24+5:30

सन २०१८ मध्ये एकाचवेळी नियुक्त झालेले चालक नियमानुसार रोजंदार गट-२ मध्ये पोहोचले. यानंतर सदर कर्मचारी नियमित होण्यासाठी पात्र ठरले. २२ जानेवारी २०१८ प्रतीक्षा यादीनुसार सात चालक कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात यादीतील पाचव्या स्थानावर असलेल्या कर्मचाऱ्याला नियमित करण्यात आले.

Corona reveals the true face of ST's Yavatmal division | कोरोनाने उघडा झाला ‘एसटी’च्या यवतमाळ विभागाचा खरा चेहरा

कोरोनाने उघडा झाला ‘एसटी’च्या यवतमाळ विभागाचा खरा चेहरा

ठळक मुद्देनाराजीचा सूर । क्रमवारी डावलून पाचव्या क्रमांकावरील कर्मचाऱ्याला केले नियमित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) खरा चेहरा कोरोनाने उघडा केला आहे. रोजंदार कर्मचाºयाला नियमित करताना केलेला गैरप्रकार पुढे आला आहे. यादीतील प्राधान्यक्रम टाळून मर्जीतील कर्मचाºयाला नियमित करण्यात आले. सेवा थांबविली असताना सोबतचा कर्मचारी ड्यूटीवर कसा, या प्रश्नाने सदर प्रकाराचा भंडाफोड झाला आहे.
सन २०१८ मध्ये एकाचवेळी नियुक्त झालेले चालक नियमानुसार रोजंदार गट-२ मध्ये पोहोचले. यानंतर सदर कर्मचारी नियमित होण्यासाठी पात्र ठरले. २२ जानेवारी २०१८ प्रतीक्षा यादीनुसार सात चालक कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात यादीतील पाचव्या स्थानावर असलेल्या कर्मचाऱ्याला नियमित करण्यात आले. यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या चार लोकांना सोडून थेट पाचव्या स्थानावर असलेल्या कर्मचाऱ्याला नियमित करण्यात आले.
महामंडळाच्या यवतमाळ विभागात झालेला हा प्रकार आता कोरोना लॉकडाऊनमुळे उघडकीस आला. रोजंदार गट-२ मधील कर्मचाऱ्यांची सेवा महामंडळाने थांबविली आहे. नियमित कर्मचारी आळीपाळीने सेवा देत आहे. रोजंदार गट-२ मधील कर्मचारीही नियमित सेवेत दिसला. यामुळे आश्चर्यचकीत झालेल्या इतर कर्मचाऱ्यांनी खोलात जाऊन चौकशी केली. त्यावेळी प्रतीक्षा यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या चालक कर्मचाºयाला नियमित करण्यात आल्याचे उघड झाले. आस्थापना शाखेचा खरा चेहरा या निमित्ताने पुढे आला आहे. झाला प्रकार लक्षात आल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना जुलै २०२० रोजी तात्काळ आदेश देण्यात आले. हा आदेश गट-२ मधील असल्याची जाणीव करून देणारा आहे. झालेल्या या सर्व प्रकाराविषयी रोष व्यक्त होत आहे.

त्यांचेही कोरोनातील नुकसान टळले असते
प्रतीक्षा यादीतील कर्मचारी नियमित झाले असते तर, आज कोरोनामुळे होणारे त्यांचे नुकसान टळले असते. कामगिरी मिळावी यासाठी प्रतीक्षा करावी लागली नसती. पेंडिंग ठेवण्यात आलेले ऑफचेही पैसे मिळाले असते. सोबतच्या नियमित झालेल्या कर्मचाऱ्याला हा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, नियमित झालेल्या या कर्मचाऱ्याला संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून कामावरून कमी केले होते.

Web Title: Corona reveals the true face of ST's Yavatmal division